Join us  

Tejasswi Prakash: Bigg Boss 15 ची विजेती, तेजस्वी प्रकाश कोण? बक्षिसाचे किती पैसे मिळाले? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 8:18 AM

Bigg Boss 15 Winner Tejasswi Prakash: अंतिम फेरीत तेजस्वी आणि प्रतिक यांच्यात टॉप 2 मध्ये चुरशीची स्पर्धा होती. शोमध्ये उपस्थित असलेले सर्वजण प्रतीकला विजेता मानत होते. सोशल मीडियावरही प्रतीकच्या नावाचीच चर्चा होती. पण सलमान खानने अचानक तेजस्वीच्या नावाची घोषणा केली.

बिग बॉस १५ च्या विजेत्यांची मध्यरात्री १२ वाजता घोषणा करण्यात आली. अभिनेत्री  तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) या सीझनची विजेती ठरली. तर प्रतिक सहजपाल उपविजेता ठरला. बिग बॉस तेजस्वीसाठी खूप लकी ठरला आहे. कारण तिला नागिन ६ मध्ये काम करण्याची ऑफरदेखील मिळाली आहे. सोबत बक्षिसाचे लाखो रुपये देखील. 

अंतिम फेरीत तेजस्वी आणि प्रतिक यांच्यात टॉप 2 मध्ये चुरशीची स्पर्धा होती. शोमध्ये उपस्थित असलेले सर्वजण प्रतीकला विजेता मानत होते. सोशल मीडियावरही प्रतीकच्या नावाचीच चर्चा होती. पण यावेळी ट्रॉफी तेजस्वीच्या नावावर लिहिली गेली. त्यामुळेच त्याने अंतिम सामन्यात प्रतीकचा पराभव करून चमकदार ट्रॉफीवर कब्जा केला. याचबरोबर तेजस्वीला बक्षिसाचे ४० लाख रुपये मिळाले. 

तेजस्वी प्रकाशने बिग बॉस 15 ची ट्रॉफी जिंकल्यानंतर पालकांसोबतचा पहिला फोटो शेअर केला आहे. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तेजस्वी आई-वडिलांसोबत बिग बॉसची ट्रॉफी हातात घेऊन खूप आनंदी दिसत आहे. बिग बॉसच्या घरातील तेजस्वीचा प्रवास एकदम धमाकेदार ठरला. करण कुंद्रासोबतची तिची रोमॅन्टिक केमिस्ट्री चांगलीच गाजली.  ‘बिग बॉस 15’च्या घरात तेजस्वी व करण कुंद्रा यांचा लव्ह केमिस्ट्री चर्चेचा विषय ठरली होती.

तेजस्वी प्रकाश कोण?9 वर्षांचा मुलगा आणि 18 वर्षाच्या मुलीच्या लग्नावर आधारित टेलिव्हिजनची वादग्रस्त मालिका ‘पहरेदार पिया की’मध्ये दिसलेली अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ‘खतरों के खिलाडी 10’या रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसली होती.   संस्कार, स्वरागिनी, पहरेदार पिया की, रिश्ता, कर्णसंगिनी अशा अनेक मालिकांमध्ये ती झळकली. टीव्हीवर कायम देसी अवतारात दिसलेली तेजस्वी ख-या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे. रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी 10’मध्येही तेजस्वीचा जलवा पाहायला मिळाला होता. रोहितची ती फेवरेट कंटेस्टंट बनली होती. तेजस्वी ही इंजिनिअर आहे. मुंबई युनिव्हर्सिटीतून तिने इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन्समध्ये इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे.

टॅग्स :तेजस्वी प्रकाशबिग बॉससलमान खान