Join us  

विशाखा सुभेदार कोण? बिचुकलेंनी विचारताच पॅडीने दिलं सणसणीत उत्तर, म्हणाला- तुमचं बघणं होत नसेल पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 12:44 PM

विशाखा सुभेदार यांना ओळखत नाही म्हणताच पॅडी बिचुकलेंना काय म्हणाला बघा (bigg boss marathi 5)

काल बिग बॉस मराठीच्या घरात भाऊचा धक्क्यावर रितेश देशमुख आला नाही. त्याऐवजी घरात आलेल्या नवीन पाहुण्यांनी घरात चांगलाच कल्ला केला. यामध्ये राखी सावंत, अभिजीत बिचुकले आणि अनिल थत्ते या तिघांची घरात एन्ट्री झाली. यावेळी अभिजीत बिचुकले आणि पॅडी कांबळे यांच्यात शाब्दिक जुगलबंदी रंगली. बोलता बोलता पॅडी कांबळेने लोकप्रिय अभिनेत्री  विशाखा सुभेदार यांचा विषय काढला. त्यावेळी पॅडी त्यांना काय म्हणाला बघा

विशाखा सुभेदार कोण? बिचुकलेंचा सवाल, पॅडी म्हणाला..

बिग बॉस मराठीच्या घरात काल बोलता बोलता पॅडीने बिचुकलेंच्या राजकीय कारकीर्दीवर प्रकाश टाकला. त्यावेळी पॅडी म्हणाला, "मी विशाखा सुभेदार यांना हा प्रश्न विचारला होता. त्यांचा तो मतदारसंघ होता कल्याण - डोंबीवली - अंबरनाथ वगैरे." हे सांगताच  अभिजीत बिचुकले म्हणतात, "विशाखा सुभेदार कोण?" पुढे पॅडी बिचुकलेंना उत्तर देताना म्हणाला की, "विशाखा सुभेदार एक छोट्याश्या अभिनेत्री आहेत पण त्यांना खूप लोकं ओळखतात. तुमचं फार बघणं होत नाही." अशाप्रकारे पॅडीने विशाखा सुभेदार यांच्याविषयी अभिजीत बिचुकलेंना सांगितलं.

पॅडी या आठवड्यात  नॉमिनेट

बिग बॉस मराठीमध्ये या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी सध्या घरात असलेले सर्वच सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यामध्ये पॅडी कांबळेचाही समावेश आहे. या आठवड्यात अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर, पॅडी कांबळे, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगांवकर हे आठ जण घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट आहेत. या ८ जणांपैकी आज कोण सेफ होणार आणि कोण घराबाहेर जाणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

   

टॅग्स :अभिजीत बिचुकलेबिग बॉस मराठीटेलिव्हिजन