Join us

सबसे स्मार्ट कौन? या कार्यक्रमामुळे तुम्ही देखील घरबसल्या जिंकू शकता 15 लाख... कसे ते वाचा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 1:20 PM

सबसे स्मार्ट कौन? कार्यक्रमात स्पर्धकांना त्यांच्या सामान्य ज्ञान आणि स्मार्टनेससाठी पुरस्कृत केले जाते. एवढेच नाही तर हा शो घरी बसून पाहणाऱ्या लोकांनाही हॉट स्टार या अॅपवर सबसे स्मार्ट कौन प्ले अलाँगसोबत दररोज बक्षिसे जिंकण्याचीही संधी देत आहे.

स्टार प्लसने नुकताच सबसे स्मार्ट कौन? हा आगळा वेगळा शो नुकताच सुरू केला आहे. स्पर्धकांना त्यांच्या सामान्य ज्ञान आणि स्मार्टनेससाठी पुरस्कृत केले जाते. एवढेच नाही तर हा शो घरी बसून पाहणाऱ्या लोकांनाही हॉट स्टार या अॅपवर सबसे स्मार्ट कौन प्ले अलाँगसोबत दररोज बक्षिसे जिंकण्याचीही संधी देत आहे. हॉट स्टारवर या शोसोबत ४ जून रोजी सबसे स्मार्ट कौन प्ले अलाँग सुरू करण्यात आला होता. गेल्या महिन्यात २३ लाख लोक सबसे स्मार्ट कौन पाहता पाहता दररोज प्ले अलाँगमध्ये खेळले आहेत. प्रत्येक भागातील प्ले अलाँगमधील टॉप स्कोअररला रोज १५ लाखाचे बक्षिस मिळते. प्ले अलाँगने सामान्यजनांचे सामान्य ज्ञान साजरे करण्याच्या आपल्या वचनाला पूर्ण केले आहे. आतापर्यंत घोषणा करण्यात आलेले विजेते विभिन्न ठिकाणांहून आणि सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमीतील आहेत. त्यामुळे प्ले अलाँगच्या माध्यमातून सबसे स्मार्ट कौनने त्यांना आत्मविश्वास प्रदान केला असून त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सक्षम बनवले आहे. स्मार्टनेस हा केवळ शिक्षणावर अवलंबून असतो, या गैरसमजुतीला या कार्यक्रमाने छेद दिला आहे. या कार्यक्रमाविषयी आपला अनुभव सांगताना रवी दुबे सांगतो, “या शोबद्दल अगदी पहिल्या दिवसापासून मी अगदी उत्साहात आहे. मी जिथे कुठे जातो, तिथे लोक मला सांगतात की, त्यांना हॉट स्टार अॅपवर हा खेळ खेळायला किती आवडत आहे आणि हा खेळ खेळण्यासाठी ते रोज संध्याकाळी ६.३० वाजण्याची आतुरतेने वाट पाहतात. या शो च्या खास संकल्पनेबद्दल माझे कौतुक झाले आहे. मी हे नक्कीच सांगू शकतो की, खूप मोठ्‌या संख्येने लोक हा खेळ अॅपवर नियमितपणे खेळत आहेत आणि हे प्रचंड लोकप्रिय होत आहे. माझी पत्नी सरगुनसुद्धा हा खेळ नियमितपणे खेळते. आमच्या प्ले अलाँग अॅपवर खेळून मोठ्‌या प्रमाणात रक्कम जिंकणाऱ्या विजेत्यांच्या पहिल्या नावांची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे. या पारितोषिकातील पैशांमुळे त्यांचे आयुष्य बदलू शकते. मला आनंद वाटतो की, आम्ही लोकांच्या आयुष्यात अशाप्रकारे बदल घडवून आणू शकत आहोत.”