Join us

कोण होतीस तू, काय झालीस तू..! मराठमोळ्या अभिनेत्रीच्या या फोटोची होतेय सर्वत्र चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 07:00 IST

मराठमोळ्या या अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल

 

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नम्रता आवटे हिने आपल्या विनोदी कौशल्याने रसिकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून नुकताच तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोची सध्या सगळीकडे खूप चर्चा होत आहे. कारण या फोटोत तिच्या लूकची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.

अभिनेत्री नम्रता आवटे हिने इंस्टाग्रामवर साडीतला फोटो शेअर केला आहे. मात्र या फोटोत तिचा बाल्ड म्हणजेच टक्कल पहायला मिळत आहे. तिने हा फोटो शेअर करत लिहिले की,  तू तेव्हा तशी तू तेव्हा अशीतू हिरवीकच्ची , तू पोक्त सच्ची तू खट्टी मिठी ओठांची.

नम्रता आवटेच्या या फोटोची सर्वत्र खूप चर्चा होताना दिसते आहे. नम्रता सध्या सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी शोमध्ये पहायला मिळते आहे. या शोमध्ये तिने सादर केलेल्या परफॉर्मन्ससाठी हा लूक केल्याचे समजते आहे.

'व्हेंटिलेटर', 'बाबू बँड बाजा', 'लूज कंट्रोल' यासारख्या विविध चित्रपटात नम्रताने महत्वाच्या भूमिका साकारल्या. यासोबतच तिने हिंदीतही आपल्या अभिनयाने छाप पाडली. आदत से मजबूर या हिंदी मालिकेत तिने लक्षवेधी भूमिका साकारली. याशिवाय रंगभूमीही नम्रताने गाजवली. आबालाल अडकित्ते आणि मुमताज महल या नाटकांमधील तिच्या भूमिकांचे विशेष कौतुक झाले आहे.

टॅग्स :नम्रता आवटे संभेरावमहाराष्ट्राची हास्य जत्रा