ठळक मुद्देशिवपाठोपाठ नेहा शितोळे विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. बहुतांश पोल्सनुसार, वीणा जगताप तिस-या, शिवानी सुर्वे चौथ्या, किशोरी शहाणे पाचव्या तर आरोह वेलणकर सहाव्या स्थानावर आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या दुस-या सीझनचा विजेता कोण होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. अवघ्या काही तासांत ‘बिग बॉस मराठी 2’च्या विजेता कोण होणार, हे आपल्याला कळणार आहे. पण त्याआधी या विजेत्याच्या नावावरून सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क बांधले जात आहेत. तूर्तास दोन स्पर्धक या ट्रॉफीचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. पण पहिल्या क्रमांकावर अर्थातच शिव ठाकरे आहे.
होय, विविध मनोरंजन वाहिन्या आणि पोर्टलनी सोशल मीडियावर आपापले पोल्स घेतले आहेत. टीव्ही9ने दिलेल्या वृत्तानुसार, बहुतांश पोल्समध्ये चाहत्यांनी ‘बिग बॉस मराठी 2’चा विजेता म्हणून शिव ठाकरेला आपली पसंती दिली आहे. तर नेहा शितोळे या पसंतीक्रमात दुस-या स्थानावर आहे. शिव ठाकरे हाच ‘बिग बॉस मराठी 2’चा विजेता होणार, हे जवळपास निश्चित असल्याचे मानले जात आहे. पोलमध्ये बहुतांश प्रेक्षकांनी शिवच्या नावाला पसंती दिली आहे. आधी प्रेक्षकांच्या पसंतीक्रमात नेहा शितोळे अग्रस्थानी होती. पण शेवटच्या आठवड्यात अचानक शिव ठाकरेंच्या बाजूने प्रेक्षकांचे पारडे झुकले. त्यामुळे सोशल मीडियावरचा कौल बघता, शिव हाच ट्रॉफी उंचावणार, असे म्हटले जात आहे.
‘रोडिज’मधून आलेला शिव ठाकरे हा मूळ अमरावतीचा. सुरुवातीपासूनच शिव ठाकरे याला प्रेक्षकांनी फेवरिट मानला जात होते. पण गेमच्या मध्याला विणासोबतच्या प्रेमप्रकरणामुळे त्याच्या लोकप्रियतेचा ग्राफ काहीसा खाली गेला. शिवला सतत वीणाच्या मागेमागे फिरताना पाहून महेश मांजरेकरांनी अनेकदा त्याची शाळा घेतली होती.
शिवपाठोपाठ नेहा शितोळे विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. बहुतांश पोल्सनुसार, वीणा जगताप तिस-या, शिवानी सुर्वे चौथ्या, किशोरी शहाणे पाचव्या तर आरोह वेलणकर सहाव्या स्थानावर आहे.