सध्या सोशल मीडियावर सध्या Mrs. मुख्यमंत्री यांची चर्चा रंगली आहे. कोण आहेत या Mrs. मुख्यमंत्री हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. Mrs. मुख्यमंत्री ही नवीन मालिका असून ती लवकरच झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
मालिकेचं नाव Mrs.मुख्यमंत्री असलं तरी ही मालिका कोणत्याही राजकीय व्यक्तीशी किंवा राजकीय घटनेशी संबंधित नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ही मालिका २४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
हक्काचं मनोरंजनाचं व्यासपीठ असलेल्या झी मराठीवर आतापर्यंत प्रेक्षकांनी नेहमीच भरभरुन प्रेम केलं आहे. त्यामुळे Mrs.मुख्यमंत्री या मालिकेलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा वाहिनीकडून व्यक्त करण्यात येत आहे.
ही मालिका संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, याचाच अर्थ लागिरं झालं जी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणारेय.