Join us

"ज्यांचं आयुष्य मी गेली ३ वर्ष रोज जगलो", हरीश दुधाडे 'कारण गुन्ह्याला माफी नाही'मधून पडला बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 16:47 IST

Harish Dudhade : 'कारण गुन्ह्याला माफी नाही' ही हरीश दुधाडेची मालिका खूप गाजली. या मालिकेत तो विजय भोसले ही पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे.

'फत्तेशिकस्त', 'फर्जंद', 'पावनखिंड' अशा ऐतिहासिक सिनेमांमध्ये बहिर्जी नाईक ही भूमिका साकारून अभिनेता हरीश दुधाडे  (Harish Dudhade) घराघरात पोहोचला. बहिर्जीबरोबरच हरीशला पोलिसाच्या भूमिकेतही चाहत्यांनी पसंत केले. 'कारण गुन्ह्याला माफी नाही' ही त्याची मालिका खूप गाजली. या मालिकेत तो विजय भोसले ही पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. दरम्यान आता त्याने या मालिकेतून निरोप घेतला आहे.

हरीश दुधाडेने फोटो शेअर करत लिहिले की, मायबाप. एक पर्व सुरू होतं , त्या प्रवासात आपण बरचं काही शिकतो ,जगतो . आणि मग ते पर्व संपतं. आज मी पोलीस निरीक्षक विजय भोसले म्हणून शेवटचा सीन केला. तुम्हा मला भरभरून प्रेम दिलतं म्हणून सर्व प्रथम तुमचे आभार. सोनी मराठी आभार, तुम्ही मला ही संधी दिलीत आणि विश्वास दाखवलात.

त्याने पुढे म्हटले की, मनवा नाईक मनापासून आभार तु सौभाग्यवती हो, तुमची मुलगी काय करते, कारण गुन्ह्याला माफी नाही या सलग ३ मालिकांचा प्रवास आपण एकत्र केला. उत्तम निर्मात्यांशिवाय उत्तम निर्मिती कधिचं होऊ शकत नाही हे तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस. चिन्मय मांडलेकर दादा मनापासून आभार. विजय भोसले जन्माला घालण्यापासून तर शेवटच्या सीन पर्यंत माझा हात धरून तू मला या वाटेवर घेऊन फिरलास. ७०० हून जास्त एपिसोड्स विजय भोसलेला तू प्रेमानं जपलंस आणि वाढवलंस. मुग्धा गोडबोले-रानडे मनापासून आभार कारण तू आहेस ते शब्द ज्यातून विजय भोसले व्यक्त झाला. ७०० प्लस एपिसोड्स तू तुझ्या प्रत्येक सीन मधून मला सरप्राइज केलेस. @mudebhimrao @amy_morai @rajesh_waradkar_22 @amol_suman_gaware , मनापासून आभार. स्पेशिअली भीम. भावा भोसले उभा करण्यात तुझा खूप मोलाचा वाटा आहे.

''तुम्ही कायमच माझी प्रेरणा राहिलात''

पडद्यामागच्या सगळ्या खऱ्या कलाकारां शिवाय विजय भोसले कायमच अपूर्ण आहे .माझे सर्व सहकलाकार तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. आणि सर्वात महत्वाचे ते ज्यांचं आयुष्य मी गेली ३ वर्ष रोज जगलो ते म्हणजे मुंबई पोलीस तुमच्या शैर्याला, ताकदीला, रणनीतीला, कष्टांना मानाचा मुजरा. पोलीस निरीक्षक विजय भोसले साकारताना तुम्ही कायमच माझी प्रेरणा राहिलात. निरोप घेतो. आता भेटू. नव्या भूमिकेत. आर्शिवाद असू द्या. तुमचाच हरीष, असे त्याने पोस्टमध्ये लिहिले.