काल 'बिग बॉस मराठी 5' ची शानदार घोषणा झाली. रितेश देशमुख यावेळी 'बिग बॉस मराठी 5' चं सूत्रसंचालन करणार आहे. 'बिग बॉस मराठी' चे याआधीचे चारही सीझन महेश मांजरेकर यांनी होस्ट केले. पण 'बिग बॉस मराठी 5' चं सूत्रसंचालन मांजरेकर करणार नाहीत. अनेकांनी रितेश देशमुखचं स्वागत केलं असलं तरीही महेश मांजरेकर नाहीत, म्हणून अनेकांना वाईटही वाटलं. महेश मांजरेकर 'बिग बॉस मराठी 5' चं सूत्रसंचालन का करणार नाहीत? यामागचं कारण समोर आलंय.
महेश मांजरेकर बिग बॉस मराठी 5 होस्ट का करणार नाहीत?
महेश मांजरेकर यांनी 'बिग बॉस मराठी' च्या याआधीचे चारही पर्वांचं सूत्रसंचालन करुन शो गाजवला. मांजरेकरांची परखड आणि स्पष्टवक्ती शैली लोकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. पण 'बिग बॉस मराठी 5' चं होस्ट महेश मांजरेकर करणार नाहीत. यामागचं कारण समोर आलंंय ते म्हणजे.. TV9 ने दिलेल्या अहवालानुसार महेश मांजरेकर यांचा कलर्स मराठीसोबत असलेला करार संपलाय. मांजरेकरांची 'बिग बॉस मराठी 5'चं होस्टींग करण्याची इच्छा होती. परंतु इतर कामाच्या कमिटमेंट्समुळे मांजरेकरांना 'बिग बॉस मराठी 5' चं होस्टींग करायला वेळ नाही. त्यामुळे 'बिग बॉस मराठी 5' साठी कलर्स मराठीने रितेश देशमुखसोबत संपर्क केला.
रितेश देशमुख बिग बॉस मराठीचा नवा होस्ट
काल कलर्स मराठी आणि JioCinema च्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंटवर “बिग बॉस मराठी” चा व्हिडिओ शेयर केला आला असून त्यामध्ये बिग बॉसचा डोळा त्याच सोबत बॅालीवूडचा स्टायलिश हिरो आणि रसिकांना ‘वेड’ लावणारा मराठमोळा मुलगा रितेश देशमुख देखील पाहायला मिळाला. या नव्या सिझनचे हे नवे सरप्राईज असणार असून या सिझनमध्ये रितेश देशमुखबरोबरच एक्स्ट्रा धमाल, एक्स्ट्रा मस्ती, एक्स्ट्रा गॅासिप्स, एक्स्ट्रा मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.