सोनी सबवरील 'मंगलम दंगलम' आपल्या चटपटीत कथेने आणि अत्यंत प्रतिभावान कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. सासरा आणि त्याचा संभाव्य जावई यांच्यामधली आगळीवेगळी थट्टामस्करी जुगलबंदी रंगवताना आगामी भागांमध्ये संजीवला वाचविण्यासाठी अर्जुन (करणवीर शर्मा) आणि संजीव (मनोज जोशी) एकत्र येतील.
रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर दुकानातील काम पुन्हा सुरु केल्यावर संजीव अर्जुनला बाजारात आणखी एका मुलीला मीठी मारताना बघतो. रुमी आणि अर्जुनच्या नात्याला आधीच नापसंत केलेला संजीव अर्जुनचा पाठलाग करतो. तो आता कुठे आहे याबद्दल रुमीलाही सांगतो. संशयी संजीवमुळे गोंधळात वाढ झालेली असताना अखेरीस रुमीला समजते की अर्जुन बरोबर असलेली मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून त्याची बहिण विद्या आहे. संजीवची मात्र अडचण होते. खराब लुंगी विकत असल्याची फिर्याद संजीववर दाखल होते. जेव्हा कपडे बाजार संघटनेचा वकील म्हणून अर्जुनची निवड होते आणि तो या केसमध्ये संजीवची बाजू लढवायला घेतो तेव्हा या कथेत विनोदी वळण येते. त्यांच्यातील रुसवे फुगवे विचारात घेता, अर्जुन आणि संजीव या खटल्यासाठी एकत्र येणार का?
संजीव सकलेचाची भूमिका साकारणारे मनोज जोशी म्हणाले, “मंगलम दंगलम'मध्ये मुलीच्या वडिलांची भूमिका साकारायला मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. वडील स्वतःच्या मुलींबाबत खूप जास्त संरक्षणात्मक असतात आणि संजीव सकलेचा हाही तसाच आहे. आगामी कथेच्या वळणावर संजीवला अर्जुन बरोबर काम करायला लागते. अर्जुन आजही त्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळावी म्हणून खूप प्रयत्न करत आहे. यामुळे प्रेक्षकांचे हसून-हसून मनोरंजन होईल, अशी मला खात्री आहे.”