छोट्या पडद्यावरील अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte). या मालिकेत आतापर्यंत अनेक रंजक वळणं आली आहेत. अनिरुद्धने अरुंधतीची फसवणूक केल्यानंतर तिच्याळं तील एका नव्या स्त्रीने जन्म घेतला. एक गृहिणी म्हणून कित्येक वर्ष वावरणाऱ्या अरुंधतीने तिच्यातील आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टीकोन देशमुख कुटुंबासह संजनालाही दाखवून दिली. त्यामुळे या मालिकेतील अरुंधती या पात्राला विशेष प्रेम मिळत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच या मालिकेत आशुतोषची एन्ट्री झाली आहे. त्याच्या येण्यामुळे या मालिकेचं सगळं चित्र पालटून गेलं आहे.
अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात अरुंधती आशुतोष आणि तिच्या मैत्री विषयी स्वत:शी संवाद साधताना दिसतेय.आशुतोषशी बोलताना कुठेही अवघडल्यासारखं होतं नाही.जे नातं आहे तू खूप छान आहे.अरुधंती आशुतोषविषयी बोलत असताना तो मागे उभा राहून हे सगळं ऐकत असतो.
आशुतोषच्या येण्यामुळे मालिकेला एक नवं वळण लागलं आहे. मात्र आशुतोष आणि अरुंधती यांच्यात खुलत असलेली मैत्री अनिरुद्धच्या डोळ्यात चांगलीच खूपत असल्याचं पाहायला मिळत आहे.संधी मिळेल तेव्हा तो आशुतोषचा अपमान करायचा प्रयत्न करतो. तर, दुसरीकडे आशुतोषला कॉलेजमध्ये असल्यापासून अरुंधती आवडते.सध्या घरात अभिषेक आणि अनघाच्या लग्नाची धामधुम आहे. लवकरच दोघे लग्नाच्यया बेडीत अडकणार आहेत.