‘आई कुठे काय करते’मध्ये अनिरुध्द संजनाला म्हणतो की, इथून गेल्यावर आपण लग्न करू. इथे आजीला विमलची आठवण येते. त्या म्हणतात तिला माहित सुध्दा नसेल ना आपली वहिनी दवाखान्यात आहे म्हणून. शेवटी आपलं घर ते आपलं घर आणि आपली माणसं ती आपली माणसं.
इतक्यात अंकिता तिथे येते. सगळे विचारतात आई कुठे आहे ?आणि कशी आहे? अंकिता म्हणते त्या अभीबरोबर मेडिसन घेऊन येतायत. मला वॉक करायचं होतं म्हणून आम्ही पुढे आलो आणि आईच्या तब्येतीबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही. आजी तिला विचारते अग डॉक्टर आहेस ना तू ? यावर अंकिता म्हणते, आपण आता फक्त सोनोग्राफी केली आहे पण, बाकीचं सगळं करायला आपल्याला मुंबईलाच जावं लागणार. यावर आप्पा बोलतात बाकीचं म्हणजे. यावर अंकिता वैद्यकिय भाषेत समजवायला जाते पण कोणाला काहीच कळत नाही. यावर यश म्हणतो आम्हाला कळेल असं बोल ना. अंकिता म्हणते काही नाही मुंबईला गेलो की आपण सगळे चेकअप करू. तुम्ही टेन्शन घेऊ नका. फक्त दुर्लक्ष करून चालणार नाही. इतक्यात अभी अरुंधतीला घेऊन येतो. सगळे आईला पाहून खूष होतात.
यानंतर अभी, आजी, आप्पा यांच्यामध्ये अरुंधतीच्या तब्येतीबाबत पु्न्हा विषय निघतो. अभी बोलतो बायकांमध्ये गर्भाशयाचे प्रॉब्लेम होणं हे कॉमन आहे. फक्त त्याकडे ते दुर्लक्ष करतात आणि आईच्या बाबतीत ही तेच झालं आणि सगळ्यात म्हत्वाचं म्हणजे स्ट्रेस..आजी म्हणते हो तु्म्ही सगळ्यांनी तिला खूप स्ट्रेस दिलाय. यावर आप्पा म्हणतात तूही तिला काही कमी त्रास दिला नाही आणि खरं म्हणजे अरुंधतीला तिचं खरं आयुष्य कधी जगताच आलं नाही. इतकी वर्षे ती फक्त आपल्यासाठी जगतेय कांचन.
अरुंधती आजी आणि अप्पांना सांगतेय मला या सगळ्यापासून दूर जायचं आहे. अरुंधती आजीच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागते. पुढील भागात आपण पाहणार आहोत की, अभी अरुंधतीला बोलतो की, आई तू मला माफ केलंस ना? तू मला माफ केलंस तर माझ्या मनावरचं अर्ध ओझ कमी होईल. अरुंधती म्हणते मी तुला माफ नाही करू शकत. तू अनघाच्या भावनांशी आणि स्वप्नांनशी खेळलायस..तू चुकलायस अभी आणि मला तुझ्या चुकीत नाही सहभागी व्हायचं.