Join us

भिडे गुरुजी सोडणार 'तारक मेहता' मालिका? मंदार चांदवाडकरने सोडलं मौन, म्हणाला- हा निर्णय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 16:36 IST

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका (Tarak Mehta Ka Ulta Chashma) या मालिकेतून भिडे गुरुजींच्या भूमिकेतून मंदार चांदवडकर (Mandar Chandwadkar) घराघरात पोहचला आहे. त्याची आणि जेठालालची जुगलबंदी प्रेक्षकांना खूप आवडते.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका (Tarak Mehta Ka Ulta Chashma) गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतून सर्व पात्र घराघरात पोहचले आहेत. या मालिकेतून भिडे गुरुजींच्या भूमिकेतून मंदार चांदवडकर (Mandar Chandwadkar) घराघरात पोहचला आहे.  त्याची आणि जेठालालची जुगलबंदी प्रेक्षकांना खूप आवडते. ते गोकुलधाम सोसायटीचे सचिव आणि व्यवसायाने शिक्षक आहेत. दरम्यान आता मंदार चांदवडकर मालिका सोडत असल्याची चर्चा रंगली आहे. आता या अफवेवर अभिनेत्याने मौन सोडले आहे.

सुभोजित घोष यांच्या पॉडकास्टमध्ये मंदार चांदवडकरने मालिका सोडण्याच्या अफवांवर मौन सोडले. तो म्हणाला की,''सोशल मीडियाचे आभार. खरोखरच एक कायदा असला पाहिजे असे वाटते, जे सोशल मीडियावर कोण असू शकते हे ठरवेल. जिथे मी मालिका सोडल्याची अफवा ही फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी केलेला अट्टाहास आहे. हे सर्व त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी आहे. अशा अफवांमुळे त्यांचे सबस्क्रायबरही वाढतात. अशा खोट्या बातम्यांमुळे, माझ्या कुटुंबीयांनी मला अनेकदा विचारले आहे की मी शो सोडण्याचा निर्णय का घेतला आहे, परंतु ते खरे नाही.''

मालिका सोडण्याबाबत अभिनेता म्हणाला...

मंदारने तारक मेहता कधीही सोडले नाही याचे मुख्य कारण म्हणजे नोकरीतील समाधान. तो म्हणाला, ''मी १७ वर्षे या मालिकेचा खूप आनंद घेतला आहे आणि आजही मी सेटवर खूप मजा करतो. मला माझे पात्र किंवा माझे काम कंटाळवाणे वाटत नाही. याउलट, आम्ही सर्वजण एक मजबूत कुटुंब बनलो आहोत, ज्यामध्ये कोणताही अहंकार नाही. आम्ही एकमेकांना अधिक चांगले करण्यासाठी प्रेरित करतो. दररोज मी सेटवर हसतो. खेळीमेळीच वातावरण सेटवर असते. आम्हाला आमच्या शोमध्ये दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मिळते. आमच्या शोला सर्वांचे आशीर्वाद मिळाले आहेत, त्यामुळेच इतक्या चढ-उतारानंतरही आम्ही १७ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहोत.''

टॅग्स :मंदार चांदवडकरतारक मेहता का उल्‍टा चश्‍मा