Join us

'रंग माझा वेगळा'मध्ये रंगणार होळीची धमाल, होळीचा सण आणेल का दीपा आणि कार्तिकला एकत्र?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 14:49 IST

Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत लवकरच होळीची धमाल पाहायला मिळणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla) उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत लवकरच होळीची धमाल पाहायला मिळणार आहे. हा सण दीपा आणि कार्तिकीला एकत्र आणेल का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

रंग माझा वेगळा मालिकेत नुकतेच पाहायला मिळाले की, श्वेता आणि आयशा दीपाला बर्बाद करण्याच्या मागे लागले आहेत. त्यासाठी ते कोणतीच कसर सोडत नाही आहेत. नुकतेच त्यांनी दीपाची कार्तिकी डाएटची पहिली ऑर्डर घेऊन जाणारा टेम्पोला आग लावतात आणि माल जळून खाक होतो. त्यामुळे दीपाचे खूप नुकसान होते. तिला आता कस्टमरला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. तर दुसरीकडे आयशा कार्तिकीच्या शाळेची फी भरा नाहीतर शाळेतून काढून टाकले जाईल अशी नोटीस दीपाला पाठवते. त्यामुळे दीपा सध्या चिंतेत आहे. 

दरम्यान श्वेता आणि आयशाची सर्व योजना राधा आईला कळते आणि राधा आई शाळेत जाऊन कार्तिकीची फी भरते. इतकेच नाही तर तिला दीपाशी केलेल्या वाईट वर्तणूकीचा पश्चाताप देखील होतो. ती श्वेताची गरोदरपणात दीपाने काळजी घ्यावी म्हणून दीपाला ईनामदारांच्या घरी घेऊन येते. त्यामुळे आता दीपा ईनामदरांच्या घरी पाहायला मिळणार आहे. सगळीकडे आता होळीची धूमधाम पाहायला मिळणार आहे. यावेळी सर्व कुटुंब धमाल करताना दिसणार आहे. दीपा आणि कार्तिकीदेखील यंदा ईनामदारांच्या घरी होळी सण साजरा करताना दिसतील. त्यामुळे होळीचा सण कार्तिक आणि दीपाला एकत्र आणेल का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.