Join us

'रंग माझा वेगळा'मध्ये दीपिका आणि कार्तिकीच्या मैत्रीमध्ये येणार का पुन्हा दुरावा?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2022 12:20 PM

Rang Maza Vegla:'रंग माझा वेगळा' मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत येणाऱ्या ट्विस्टमुळे पुढे काय घडणार, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. दरम्यान नुकताच मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोतून पाहायला मिळत आहे की, दीपिका आणि कार्तिकीच्या मैत्रीत पुन्हा दुरावा येण्याची शक्यता आहे.

स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर रंग माझा वेगळाचा प्रोमो शेअर केला आहे. त्यात पाहायला मिळतंय की, कार्तिक दीपिकाला सांगतो आहे की, डॅडाने युएसला जायचे नक्की केलं आहे. तु येणारेस ना त्याच्याबरोबर. त्यावर दीपिका म्हणते की, तिथे कार्तिकी नसणार, ग्रॅण्ड माँ नसणार, आजोबा नसणार. मी येणार नाही म्हणजे नाही. तिचे हे म्हणणे ऐकून कार्तिक चिडतो आणि बोलतो की, तू ऐकणारच नाही आहेस का? दीपिका नाराज होते. 

या व्हिडीओत पुढे पाहायला मिळते की, त्यानंतर कार्तिक सौंदर्याला सांगतो की, दीपिका माझ्यासोबत युएसला येणार त्यावर सौंदर्या बोलते की, दीपिका माझ्यासोबत राहणार हे सांगून ठेवते. दीपिका कार्तिकसोबत युएसला गेली तर पुन्हा एकदा ती कार्तिकीपासून दूर जाईल. त्यामुळे दीपिका आणि कार्तिकीच्या मैत्रीत दुरावा येणार की नाही आणि कार्तिक दीपिका नाही आली तर युएसला जाईल का, हे पुढच्या भागात स्पष्ट होईल. सध्या सौंदर्या दीपा आणि कार्तिकीसोबत त्यांच्या घरी राहते आहे. त्यामुळे पुढे काय घडते हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

टॅग्स :स्टार प्रवाह