'मन उडू उडू झालं' या मालिकेत सध्या देशपांडे सरांच्या कुटुंबात अनेक घडामोडी घडतांना दिसत आहेत. सानिकाच्या प्रेग्नंसीचं सत्य सगळ्यांसमोर आलं आहे. त्यामुळे आता देशमुख कुटुंबातील सगळ्यांनाच धक्का बसला आहे. देशपांडे सर आणि त्यांच्या पत्नीला जबरदस्त धक्का बसला आहे. मात्र, हे सत्य समोर आल्यानंतरही सानिकाच्या स्वभावात काहीही फरक पडलेला नाही. उलट ती पूर्वीपेक्षाही जास्त उद्धटपणे सगळ्यांनी बोलत आहे. त्यामुळे आता तिच्या बाळाची जबाबदारी कार्तिकने घ्यावी असा देशपांडे सरांनी निर्णय घेतला आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सानिकाचं सत्य सगळ्यांसमोर आलं आहे. ज्यामुळे आई पूर्णपणे खचून गेली आहे. इतकंच नाही तर समाजाला काय सांगायचं या भीतीने ती सानूला बरंच खरं खोटं सुनावते. पण, सानू मात्र उद्धटपणे आईला उत्तर देते. इतकंच नाही तर या बाळावर आणि माझ्यावर कार्तिकचा हक्क आहे असंही ठणकावून सांगते. त्यामुळे संतापलेल्या देशपांडे सर कार्तिकला घरी बोलावण्यासाठी फोन करतात. मात्र, कार्तिकी भीतीपोटी तिच्या घरी जाण्यास नकार देतो.
दरम्यान, कार्तिक सानिकाच्या घरी जाण्यास नकार देत असल्याचं इंद्राला समजतं. त्यामुळे आता तो त्याला बळजबरीने देशपांडे सरांकडे जाण्याची आणि या बाळाची जबाबदारी स्वीकारण्यास सांगतो. पण, कार्तिक खरंच या बाळाची जबाबदारी स्वीकारेल का? की अशा परिस्थितीत सानिकाला एकटं सोडेल? हे लवकरच मालिकेतून प्रेक्षकांना कळणार आहे.