Join us

बाहेर आल्यावर जान्हवीसोबत काम करणार का? पॅडी कांबळे म्हणाला- "भविष्यात या गोष्टी होऊ नयेत म्हणून..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 2:32 PM

जान्हवी पॅडीला बिग बॉस मराठीच्या घरात ओव्हरअ‍ॅक्टिंग करतो असं म्हणाली होती. त्यानंतर लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत पॅडीने याविषयी भाष्य केलंय (bigg boss marathi 5, paddy kamble)

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सीझनमधून या रविवारी पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे घराबाहेर गेले. पॅडीची घरात शेवटपर्यंत खूप चर्चा होती. परंतु पॅडीला घराचा निरोप घ्यावा लागला. पॅडी घराबाहेर आल्यावर त्याने लोकमत फिल्मीशी बोलताना एका गोष्टीवर त्याचं मौन सोडलं. ओव्हरअ‍ॅक्टिंग म्हणत जान्हवीने हिणवल्याने पॅडी तिच्यावर चांगलाच नाराज झाला होता. याशिवाय पुन्हा मी जान्हवीसोबत काम करणार नाही असं त्याने ठरवलं होतं. याच मुद्द्यावर पॅडीने त्याचं मत व्यक्त केलंय. 

बाहेर आल्यावर जान्हवीसोबत पॅडी काम करणार का?

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत भविष्यात जान्हवीसोबत काम करणार का? असं विचारताच पॅडी म्हणाला, "माझा राग व्यक्त करण्याची ती भाषा होती. मी राग कशा पद्धतीने व्यक्त करावा? मी तिला काही शिवीगाळ करु शकत नव्हतो. ती जशी माझ्याबद्दल बोलली तसं मी बोलू शकणार नव्हतो. त्यामुळे मी अशा पद्धतीने माझा राग व्यक्त केला. पण मला नाही वाटत मी भविष्यात तसं करेन. कदाचित तिच्यामुळे मला काढू शकतात लोक तर माझ्यामुळे तिला काढू शकतात, त्यामुळे या गोष्टी होऊ नयेत."

पॅडी पुढे म्हणाला, "तिनेही काम करावं. मी सुद्धा काम करावं. दोघांनी एकत्र काम करावं. फक्त काही गोष्टींचं sarcaism असेल सोबत. यापुढे काम करताना जान्हवीला बारीकसा टोचा असणार माझा. आपण काम करतोय ठीकय पण ते मी विसरलेलो नाहीय. काम करणार तिच्यासोबत वाद नाही!" अशाप्रकारे पॅडीने जान्हवीला किती सहज माफ केलंय हे पाहायला मिळतं. एक कलाकार म्हणून पॅडीच्या मनाचा मोठेपणाही दिसून येतो.

टॅग्स :बिग बॉस मराठीभातटेलिव्हिजन