बिग बॉस फेम शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि बॉलिवूड अभिनेत्री डेझी शाह (Daisy Shah) यांच्या अफेयरच्या बातम्या अनेकदा चर्चेत असतात. याआधीही त्यांच्या लग्नाबाबत बऱ्याचदा चर्चा झाल्या आहेत आणि या वृत्ताला डेझीने फेटाळून लावले आहे. आता पुन्हा एकदा एका मुलाखतीत डेझीने शिव ठाकरेंसोबतच्या नात्यावर मौन सोडले आहे.
शिव ठाकरे हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. तो बिग बॉस १६ मध्ये दिसला आणि सलमान खानच्या या रिॲलिटी शोने त्याला चांगलीच ओळख दिली. यानंतर तो रोहित शेट्टीच्या शो 'खतरों के खिलाडी सीझन १३'मध्ये झळकला. या शोमध्ये त्याची ओळख अभिनेत्री डेजी शाहसोबत झाली. शोदरम्यान दोघांची चांगली मैत्री झाली. त्यांचा हा बॉन्ड पाहून अनेकांनी दोघं एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज लावला. मात्र, अभिनेत्रीने यावर अनेकदा आपले मत व्यक्त केले आहे. आता पुन्हा एकदा तिने यावर मौन सोडले आहे.
शिव आणि मी चांगले मित्र आहोतई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली की, लग्नापर्यंत अफवा पोहोचण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशा बातम्या येत आहेत. शिव आणि माझ्यात काहीही नाही. आम्ही खूप चांगले मित्र आहोत. अफवा उडत आहेत कारण एक काळ असा होता जेव्हा मी या इंडस्ट्रीत आले होते माझ्यासाठी सर्व काही अगदी नवीन होते आणि कोणीतरी माझा हात धरून मला मार्गदर्शन केले.
शिव-डेझी एकमेकांना देतात सल्ले डेझी शाह पुढे म्हणाली की, जेव्हा मी शिवला भेटले तेव्हा त्याने मला रिॲलिटी शोबद्दल सांगितले. जेव्हा चित्रपटांची गोष्ट येते तेव्हा त्याला थोडे मार्गदर्शन हवे असते. अशा परिस्थितीत आम्ही एकमेकांना सल्ला देतो. त्याला माझ्यापेक्षा रिॲलिटी शोमध्ये जास्त अनुभव आहे आणि मला चित्रपटांचा जास्त अनुभव आहे. आमचे नाते खास आहे कारण आम्ही एकमेकांशी खूप बोलतो. जेव्हा तुम्ही एकमेकांसोबत अधिक गोष्टी शेअर करता तेव्हा लोक त्याचा अर्थ तुम्ही रिलेशनशिपमध्ये असल्यासारखे करू लागतात.