Join us  

'फुलाला सुंगधी मातीचा'मध्ये या लोकप्रिय अभिनेत्रीची होणार एंट्री, मालिकेत येणार नवा ट्विस्ट?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 11:15 AM

या मालिकेत सध्या किर्तीची आयपीएसची खडतर ट्रेनिंग सुरू झालेली आहे. आता या मालिकेत एका नव्या अभिनेत्रीचे एंट्री झाली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील फुलाला सुगंध मातीचा (Phulala Sunghandh Maticha Serial) ही मालिका गेल्या अनेक दिवसापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेत सध्या किर्तीची आयपीएसची खडतर ट्रेनिंग सुरू झालेली आहे. आता या मालिकेमध्ये नवीन वळण आले आहे.या मालिकेमध्ये अनेक भूमिका प्रेक्षकांच्या आवडीच्या आहेत. दरम्यान या मालिकेत आता एका नव्या अभिनेत्रीचे एंट्री झाली आहे. हिच्या येण्यामुळे आता मालिकेत लवकरत नवीन ट्वीस्ट पाहायला मिळणार याबद्दल सर्वांना उत्सुकता लागली आहे.

फुलाला सुंगध मातीचा मालिकेत लवकरच अभिनेत्री भाग्यश्री नवलेची ( Bhagyashree Nhalve )एंट्री होणार आहे. या  मालिकेत ती कविताची भूमिका साकारणार आहे. आधी शुभमचं लग्न कविताशी ठरलं असतं. सोशल मीडियावर एक प्रोमो व्हायरल होत आहे. यामध्ये फुलाला सुंगध मातीचा मालिकेत भाग्यश्रीची एंट्री दाखवण्यात आली आहे.

शुभमची बहीण जान्हवी जेव्हा संध्याकाळी घरी येत असते तेव्हा काही लोक तिच्याशी भर रस्त्यात गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करतात. यावेळी एक मुलगी तिच्या मदतीला धावून येते व तिची या लोकांच्या तावडीतून सुटका करते. हॉकी स्टीकनं ती या लोकांना मारते. हा घडलेला प्रकार जान्हवी जिजी अक्काला आणि शुभमला घरात आल्यानंतर सांगते. तेव्हा जिजी अक्का म्हणतात,तिला घरी तर घेऊन यायचस ना..जान्हवी म्हणते हो ती आली आहे.

यावेळी तिला पाहून जिजी आक्का आणि शुभमच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. कविताच्या येण्यामुळे शुभम आणि किर्तीच्या आय़ुष्यात कोणतं नवीन वादळ येणार हे येणारा काळचं सांगेल. शिवाय तिचा परत येण्यामागे काय हेतू आहे याचा येणाऱ्या भागातच उलगडा होईल.

टॅग्स :स्टार प्रवाहटिव्ही कलाकार