सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील पुण्यश्लोक अहिल्याबाई मालिकेची कहाणी १८ व्या शतकातील आहे आणि ही एका अशा स्त्रीची कहाणी आहे, जिचे विचार काळाच्या पुढचे होते आणि तिला तिच्या सासर्यांची निरंतर साथ होती. ज्या काळात सामाजिक रूढी आणि पितृप्रधान समाजरचनेचा जीवनावर खूप पगडा होता, शिक्षण स्त्रियांसाठी निषिद्ध होते, किंबहुना स्त्रियांना स्वतःचा आवाज किंवा अधिकारच नव्हते, अशा काळात अहिल्याबाई यांनी याचे ठळक उदाहरण सादर केले की माणूस जन्माने किंवा तो स्त्री किंवा पुरुष असल्याने नाही; तर त्याच्या कर्तृत्त्वाने महान होतो.
या मालिकेत टीव्ही अभिनेता राजेश शृंगारपुरे अहिल्याबाईंच्या सासर्यांची, मल्हारराव होळकरांची भूमिका करत आहे. सर्वांसाठी शिक्षण आणि समानता या बाबतीत राजेश शृंगारपुरे यांची ठाम मते आहेत. सध्याच्या कथानकात देखील अहिल्याबाईंची शिकण्याची तळमळ आणि शिक्षणाचे महत्त्व दाखवले आहे.