एकता कपूर (Ekta Kapoor) अल्ट बालाजी(Alt Balaji) च्या XXX या बोल्ड वेब सीरिजशी संबंधित मुद्द्यामुळे सध्या चर्चेत आहे. टेलिव्हिजनची क्वीन म्हटली जाणारी एकता गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या वेब सीरिज 'XXX' सीझन 2 बाबत वादात सापडली आहे. यासाठी एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आल्याचे वृत्त होते. बिहारमधील बेगुसराय येथील स्थानिक न्यायालयाने एकता आणि तिच्या आईला अटक करण्याचे आदेश दिले होते, मात्र या प्रकरणात त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाटणा हायकोर्टाने एकता आणि शोभा कपूर यांना दिलासा देताना या दोघांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असं म्हटलं आहे.
एकता कपूरची वेब सीरिज XXX काही एडल्ट सीन्समुळे चर्चेत आली होती. याबाबत नुकतेच सुप्रीम कोर्टानेही एकताला फटकारले आहे. मात्र आता मोठा दिलासा मिळाला आहे. एकता आणि शोभा कपूर यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचे पाटणा उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. यासोबतच न्यायालयाने तक्रारदाराला नोटीस बजावून आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी डिसेंबरमध्ये होणार आहे, तोपर्यंत एकता कपूरला बेगुसराय न्यायालयात जाण्याची गरज नाही.
ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ऑल्ट बालाजीच्या XXX वेब सिरीजमधील आक्षेपार्ह सीन विरोधात ६ जून २०२० ला माजी सैनिक शंभू कुमार यांनी सीजीएम कोर्टात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर बेगुसरायचे न्यायदंडाधिकारी विकास कुमार यांच्या न्यायालयाने वॉरंट काढला होता त्यानंतर एकता कपूरने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर दाखल याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने तिला खडसावले होते
न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने सांगितले की, “काही तरी केले पाहिजे. तुम्ही या देशातील तरुण पिढीचे मन कलुषित करत आहात. OTT हा प्लॅटफॉर्म सगळ्यांना उपलब्ध आहे. तुम्ही लोकांना कोणते पर्याय देत आहात? उलट तरुण पिढीचे विचार दूषित करत आहात.