'या सुखांनो या' मालिकेतील ही चिमुरडी आता दिसते अशी, जाणून घ्या तिच्याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 07:00 AM2021-06-30T07:00:00+5:302021-06-30T07:00:00+5:30
२००५ साली ऐश्वर्या नारकर, राजन भिसे, शर्वरी लोहकरे, विक्रम गोखले, संपदा कुलकर्णी हे कलाकार असलेली ‘या सुखांनो या’ ही मालिका लोकप्रिय ठरली होती.
२००५ साली ऐश्वर्या नारकर, राजन भिसे, शर्वरी लोहकरे, विक्रम गोखले, संपदा कुलकर्णी या कलाकारांनी झी मराठीवरील ‘या सुखांनो या’ ही मालिका लोकप्रिय ठरली होती. या मालिकेत श्रद्धा रानडे हिने बालकलाकाराची भूमिका साकारली होती. या मालिकेतून श्रद्धा रानडे घराघरात पोहचली होती. मात्र आता ती सिनेइंडस्ट्रीपासून थोडीशी दुरावलेली पहायला मिळत आहे.
अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या श्रद्धा रानडेने चांगले संस्कार व्हावेत यादृष्टीने तिने शालेय सुट्ट्यांमध्ये नाट्यशिबिरात सहभाग घेतला होता. श्रद्धाने अगदी लहान वयातच जाहिरातीत काम मिळवले. ई टीव्ही वरील भाग्यविधाता,झी टीव्हीवरील ममता , झी मराठीवरील या सुखांनो या, मी मराठीवरील खेळ मांडला अशा मालिकेतून तिला बालकलाकार म्हणून काम केले.
या सुखांनो या मालिकेत काम करताना श्रद्धा तिसरी इयत्तेत शिकत होती. सेटवरील सर्वच कलाकार तिच्या अभ्यासाकडे खूप लक्ष द्यायचे. इंग्रजी माध्यमातून शिकत असलेल्या श्रद्धाला मराठीतून लिहिलेली स्क्रिप्ट वाचायला कठीण जात होते. मात्र त्यावेळी या सर्वच कलाकारांनी तिला ती लिहिलेली स्क्रिप्ट वाचण्यास प्रवृत्त केले.
हमाम साबण, अँम्बी व्हॅली, डॉ फिक्सइट अशा जाहिराती तसेच डिस्नी वाहिनीच्या पेटपूजा शो, आम्ही सारे खवय्ये चिल्ड्रन स्पेशल, सह्याद्री वाहिनीच्या दमदमादम अशा शोमधून तिला झळकण्याची संधी मिळाली. जॉनी लिव्हरसोबत होप ऑफ कार्निव्हल ही टेलिफिल्म तिने तब्बल पाच भाषांमध्ये सादर केली.
अभिनयासोबतच अनेक वर्षांपासून तिने भरतनाट्यमचे धडे देखील गिरवले आहेत. दहावीत असताना तिने ओरिसा सेमिक्लासिकलच्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग दर्शवला होता.
शालेय शिक्षणानंतर श्रद्धाने डी जी रुपारेल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून कॉमर्स विषयातून पदवी मिळवली आहे.