छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) लोकप्रिय कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम घराघरात आवडीने पाहिला जातो. या कार्यक्रमातून अनेक विनोदवीरांना लोकप्रियता मिळाली आहे. प्रसाद खांडेकर(Prasad Khandekar)देखील महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे घराघरात पोहचला आहे. तो सोशल मीडियावर सक्रीय असून पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतो. दरम्यान आता प्रसाद खांडेकरने कुटुंबासोबत जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेतले आणि फोटो सोशळ मीडियावर शेअर केले आहेत.
प्रसाद खांडेकरने सोशल मीडियावर फोटो शेअर करत लिहिले की, यळकोट यळकोट जय मल्हार. या फोटोत पाहायला मिळतंय की, अभिनेत्याने त्याच्या कुटुंबासोबत जेजुरीच्या खंडोबा रायाचं दर्शन घेतलं. यावेळी त्याची आई, पत्नी आणि मुलगा देखील दिसतो आहे. यानिमित्ताने त्यांचे संपूर्ण कुटुंब चाहत्यांना पाहायला मिळाले.
प्रसाद खांडेकर अभिनेता असण्याबरोबरच लेखक आणि दिग्दर्शकदेखील आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातील अनेक स्कीटचे तो लेखन करत असतो. सध्या त्याच्या थेट तुमच्या घरातून या नाटकाचे प्रयोग सुरु आहेत. शेवटचा तो चिकी चिकी बुबूम बूम सिनेमात पाहायला मिळाला. यात त्याच्याव्यतिरिक्त प्राजक्ता माळी, प्रार्थना बेहेरे, स्वप्नील जोशी आणि वनिता खरात हे कलाकार आहेत.