याशिका आनंद ही तमिळ अभिनेत्री आहे जी गेल्या वर्षी तिच्या कारला झालेल्या अपघातामुळे चर्चेत आली होती. जुलै 2022 मध्ये, याशिकाचा महाबलीपुरमजवळ अपघात झाला, यात तिच्या मित्राचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला असून सुनावणी प्रलंबित आहे. आता या प्रकरणातील लेटेस्ट अपडेटनुसार, याशिका हजर न झाल्याबद्दल न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे.
रिपोर्टनुसार याशिका आनंदला काही दिवसांपूर्वी कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र ती हजर राहिली नाही. त्यामुळे कोर्टाने अभिनेत्रीला पुन्हा नोटीस पाठवली आहे. जर २५ एप्रिल रोजी याशिका कोर्टा पुढे हजर झाली नाही, तर कार अपघात प्रकरणात तिला पोलिसांकडून अटक केली जाण्याची शक्यता आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
अभिनेत्री जी एसयूव्ही चालवत होती ती डिव्हायडरला धडकल्यानंतर उलटली. 24 जुलै रोजी पहाटे हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर ती 6 महिन्यांहून अधिककाळ अंथरुणाला खिळून होती.
याशिकाने 2016 पासून आपल्या अभिनय कारकिर्दीला तमिळ सिनेमातून सुरुवात केली. पण तिला 2018 मध्ये 'बिग बॉस तमिळ'च्या दुसऱ्या सीझनमधून मोठे यश मिळाले ज्यामध्ये ती स्पर्धक म्हणून दिसली.