बॉलिवूड असो किंवा टीव्ही इंडस्ट्री इथं रोज नवे चेहरे आपल्या भेटीला येतात. आणि काळाच्या ओघात काही चेहरे या इंडस्ट्रीत मागे पडतात तर काही अभिनयाच्या जगाला रामराम करतात. असाच एका प्रसिद्ध चेहरा होता 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये अक्षराच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा.
ये रिश्ता क्या कहलाता है' मधील राजश्री म्हणजेच लता सभरवाल यांनी आपल्या दमदार अभिनयाने घराघरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक वर्षांपासून लता लोकांच्या मनावर राज्य करत आहेत. शाहिद कपूर आणि अमृता राव यांच्या 'विवाह' या चित्रपटातूनही तिल प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटात तिने शाहिद कपूरच्या वहिनीची भूमिका साकारली होती.
लताने मालिकांपासून दूर राहण्यामागे चांगली व्यक्तिरेखा आणि चांगली स्क्रिप्ट नसणे हे मुख्य कारण असल्याचे सांगितले. अभिनेत्री आजकाल चित्रपटांमध्ये दिसतात. 'विवाह'पूर्वी लता सभरवाल शाहिद कपूर आणि अमृता राव यांच्या 'इश्क विश्क' या चित्रपटातही दिसली होती, ही अभिनेत्री बॉलिवूडमधील अशा काही अभिनेत्यांपैकी एक आहे जी साईड रोल करूनही प्रेक्षकांवर छाप सोडतात. अभिनेत्रीने तिच्या 2 दशकांच्या कारकिर्दीत जवळपास 10 वर्षे 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये अक्षराच्या आईची भूमिका साकारली.
लता सबरवाल यांनी 1999 साली ‘गीता रहस्य’ या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर डेब्यू केला होता. या मालिकेत त्यांनी द्रौपदीची भूमिका साकारली होती. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मधील को-स्टार संजीव सेठसोबत तिने लग्न केलं. या मालिकेच्या सेटवर दोघांमधील जवळीक वाढली. काहीकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी २०१०मध्ये लग्न केलं.