'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिका गेल्या काही वर्षापासून वेगवेगळ्या कारणामुळे चांगलीच चर्चेत आहे. या लोकप्रिय मालिकेतून कलाकारांनाही वेगळी ओळख मिळाली आहे.अभिनेता शाल्व किंजवडेकर म्हणजेच रसिकांचा लाडका ओमने तर अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली होती. याच मालिकेतून त्याने पदार्पण केल आणि बघता बघता तो आता तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. मालिकेप्रमाणेच शाल्वच्या लोकप्रियतेत सुद्धा दिवसागणिक वाढ होत चालली आहे.त्यामुळे त्याच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात तितकाच रस असतो. मालिकेत त्याच्याविषयी कोणती गोष्ट आवडली आण कोणती खटकली या सगळ्यांवर चाहते कमेंट्सद्वारे आपले मत मांडत असतात.
एकीकडे रसिकांना ही मालिका सुरुवातीपासून आवडत असली तरी, काही दिवसांपासून मालिकेवर रसिक प्रचंड नाराजी व्यक्त करताना दिसतात. मालिका प्रचंड ट्रोलही होत आहे. मालिकेत घडणाऱ्या काही गोष्टी आता रसिकांच्याही पचनी पडत नाहीयेत. मालिकेत आता आणखीन एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेत ओमचा मेकओव्हर झाला आहे. या लूकमुळे त्याची बॅड बॉय इमेज बनल्याचे पाहायला मिळतंय.
मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी ओमच्या बॅड बॉय इमेजसाठी मालविका, मोहित आणि नलू मावशी यांनाच जबाबदार धरले आहे. नेटकरी पुन्हा एकदा संताप व्यक्त करताना दिसतात.तर दुसरीकडे काहींनी ओमच्या नवीन लूकला चांगलीच पसंती दिली आहे.
ओमचा लूक पाहून चाहते वेगवेगळ्या कमेंट करुन आता त्याने कसे वागायला हवे या गोष्टी सुचवताना दिसतायेत. आजपर्यंत खूप रडलाय आता रडवायची वेळ आलीय, सगळ्यात आधी मोहितला सरळ कर नंतर मालविका. या दोघांना खूप त्रास दे, ज्यामुळे दोघांचे सत्य समोर येईल. तर दुसऱ्या नेटीझन्सने म्हटले आहे की, या सगळ्याला फक्त मालविका,मोहित आणि नलू मावशी जबाबदार आहे. तर काहींनी ओमचा हा न्यू रावडी लुक पाहाण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.