Join us

येऊ कशी तशी मी नांदायला फेम आदिती सारंगधरने खास अंदाजात दिल्या पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 6:53 PM

आदितीच्या लग्नाचा आज वाढदिवस असून तिने खास अंदाजात तिच्या नवऱ्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

ठळक मुद्देयेऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत आपल्याला मालविकाच्या भूमिकेत आदिती सारंगधरला पाहायला मिळत आहे. आदितेने या साकारलेली खलनायिकेची भूमिका तिच्या चाहत्यांना चांगलीच आवडत आहे.

येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका काहीच महिन्यांपूर्वी सुरू झाली असून ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. तसेच या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. स्वीटू आणि ओमची प्रेमकथा आपल्याला येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत पाहायला मिळत आहे. स्वीटू ही गरीब आहे तर ओम हा अतिशय श्रीमंत आहे. ओम नेहमीच स्वीटूच्या प्रत्येक समस्येत तिच्या पाठिशी उभा राहातो. पण स्वीटू आणि ओमची ही मैत्री ओमच्या बहिणीला म्हणजेच मालविकाला अजिबातच आवडत नाही.

येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत आपल्याला मालविकाच्या भूमिकेत आदिती सारंगधरला पाहायला मिळत आहे. आदितेने या साकारलेली खलनायिकेची भूमिका तिच्या चाहत्यांना चांगलीच आवडत आहे. आदितीच्या लग्नाचा आज वाढदिवस असून तिने खास अंदाजात तिच्या नवऱ्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्या दोघांचा एक क्यूट फोटो पोस्ट करत आपल्या लग्नाला आठ वर्षं झाली असे तिने लिहिले आहे.

आदितीचे लग्न सुहास रेवांदेकरसोबत 25 मे 2013 ला झाले. तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटला तिचे कुटुंबियांसोबतचे अनेक फोटो आपल्याला पाहायला मिळतात.

आपल्या अभिनयाने अदितीने टीव्ही, मालिका, आणि सिनेमा अशा तिन्ही माध्यमांमध्ये ठसा उमटवला आहे. रुईया कॉलेजमध्ये असताना आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत गाजलेल्या मंजुळा या एकांकिकेपासून अदितीने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. एकांकिकेतून व्यावसायिक रंगभूमीवर तिने पाऊल ठेवलं.याशिवाय छोट्या पडद्यावरील 'दामिनी', 'वादळवाट', 'लक्ष्य' अशा मालिकांमधून ती घराघरात पोहचली. 'नाथा पुरे आता' या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत तिने पाऊल ठेवलं. यानंतर विविध सिनेमांमध्ये तिने आपल्या अभिनयाची झलक दाखवून दिली. 'प्रपोजल' हे नाटक अदितीच्या कारकिर्दीतील मैलाचं दगड ठरलं. या नाटकातील भूमिकेसाठी विविध पुरस्कारानं अदितीचा गौरवही करण्यात आला.

टॅग्स :झी मराठी