Join us

येऊ कशी तशी मी नांदायलामधील रॉकीचे आई-वडील देखील आहेत कलाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 4:42 PM

येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत रॉकीच्या भूमिकेत असेलल्या त्रियुग मंत्रीच्या आई-वडिलांनी चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये काम केले आहे.

ठळक मुद्देत्रियुगचे आई-वडील दोघेही अभिनेते असून त्याने आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत या क्षेत्रात आपले करिअर केले आहे. त्रियुगचे वडील नितीन मंत्री यांनी सरनोबत या नाटकात काम केले होते.

येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका नुकतीच सुरू झाली असून ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. तसेच या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. 

स्वीटू आणि ओमची प्रेमकथा आपल्याला येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत पाहायला मिळत आहे. स्वीटू ही गरीब आहे तर ओम हा अतिशय श्रीमंत आहे. ओम नेहमीच स्वीटूच्या प्रत्येक समस्येत तिच्या पाठिशी उभा राहातो. पण स्वीटू आणि ओमची ही मैत्री ओमच्या बहिणीला अजिबातच आवडत नाही. ओमच्या बहिणीच्या आयुष्यात रॉकी नावाचा मुलगा असून त्याचे तिच्यावर जीवापाड प्रेम आहे. हा रॉकी हिंदीभाषिक दाखवला असून त्याचे काम प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. 

येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत रॉकीच्या भूमिकेत आपल्याला त्रियुग मंत्रीला पाहायला मिळत आहे. त्याची ही पहिलीच मराठी मालिका असून त्याने याआधी अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. सीआयडी, संकटमोचन महाबली हनुमान, सम्राट अशोक , महाराणा प्रताप, विघ्नहर्ता गणेश यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये तो झळकला होता. त्रियुगचे आई-वडील दोघेही अभिनेते असून त्याने आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत या क्षेत्रात आपले करिअर केले आहे.

त्रियुगचे वडील नितीन मंत्री यांनी सरनोबत या नाटकात काम केले होते. हे नाटक साठीच्या दशकात रसिकांना पाहायला मिळाले होते तर त्याची आई सुलभा मंत्री यांनी चोरबाजार, टपाल, धुमशान, पूर्ण सत्य, प्रेमासाठी वाट्टेल ते, आधारस्तंभ यासांरख्या चित्रपटात काम केले आहे. तसेच त्या दामिनी, साराभाई व्हर्सेस साराभाई यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये झळकल्या आहेत. त्यांचे काही वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. 

टॅग्स :झी मराठी