लैच लवकर गेलास रं भावा..., 'जाण्याचं' टायमिंग चुकवलंस दोस्ता..., किरण मानेंची भावुक पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 07:02 PM2022-07-04T19:02:42+5:302022-07-04T19:03:11+5:30

Kiran Mane : मराठी छोट्या पडद्यावरील अभिनेते किरण माने बऱ्याचदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते. दरम्यान आता त्यांची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे.

you gone soon, Bhava ..., I missed the 'going' time, friend ... Kiran Mane's social media post goes viral | लैच लवकर गेलास रं भावा..., 'जाण्याचं' टायमिंग चुकवलंस दोस्ता..., किरण मानेंची भावुक पोस्ट चर्चेत

लैच लवकर गेलास रं भावा..., 'जाण्याचं' टायमिंग चुकवलंस दोस्ता..., किरण मानेंची भावुक पोस्ट चर्चेत

googlenewsNext

मराठी छोट्या पडद्यावरील अभिनेते किरण माने (Kiran Mane) सोशल मीडियावर सक्रिय आहेत. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. तसेच बऱ्याचदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते. दरम्यान आता त्यांची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे. यात त्यांनी दिवंगत अभिनेते सतीश तारे (Satish Tare) यांची खास आठवण सांगितली आहे. येड्यांची जत्रा, नवरा माझा भवरा, नवरा माझा नवसाचा, बालक पालक, वळू, एक होता विदूषक अशा चित्रपटातून सतीश तारे यांनी विनोदी ढंगाच्या भूमिका साकारल्या होत्या. विनोदाचे अचूक टायमिंग हेरणाऱ्या सतीश तारे यांचे ३ जुलै २०१३ रोजी यकृताचा विकार झाल्याने निधन झाले. 

किरण मानेंनी सतीश तारे यांचा फेसबुकला फोटो शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी लिहिले की, ...आमच्यातनं जाऊन तुला आज नऊ वर्ष झाली ! नाटकात तू खाली पडल्यावर, शरीराची खत्त्तरनाक नागमोडी वळणं घेत वर उसळी मारायचास... टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. तशीच मागच्या वर्षीची ही पोस्ट 'सर्रकन' वर आलीय भावा...तुला काय म्हणू गड्या? अष्टपैलू? हरहुन्नरी? गुणी?? अफलातून-कलंदर-अवलिया??? नाय नाय नाय नाय.. ही सग्ग्गळी विशेषणं फिकी पडतील इतका महान होतास तू ! पण बेफिकीरपणे जगलास आणि त्याच बेफिकीरीने गेलास. आम्हा सगळ्यांचं डोंगराएवढं नुकसान करून ठेवलंयस माहितीय का तुला...? तू कधीच कुणाची नक्कल केली नाहीस.  'स्वत:ची एक वेगळीच श्टाईल असलेला' खराखुरा विनोद'वीर' होतास तू... साध्या-साध्या वाक्यांच्याही विशिष्ठ उच्चारातून - बिनचूक शब्दफोडीतून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा तुझ्यासारखा अफाट नट मी आजवर पाहिला नाही. तुझी 'आंगीक लवचिकता' केवळ अ फ ला तू न ! नादखुळा !! जबराट !!!


त्यांनी पुढे लिहिले की, तू निव्वळ 'महान' अभिनेता होतास. उत्तम लेखक-दिग्दर्शक-गायक-वादक... 'ऑल इन वन' होतास राव ! हार्मोनियम, गिटार, तबला अशा वाद्यांवर सफाईनं हात फिरायचा तुझा... पण...अनेक मनस्वी कलावंतांना असलेला एक 'शाप' तुलाही होता...नाहीतर ही वेळ होती का यार जायची?? आज किती नाट्यरसिकांना माहिती असंल की आपण काय गमावलंय... आपल्यातनं जो गेला तो किती 'महान' होता...माहितीय??? बोलता-बोलता कधी मी सतीश तारेची तुलना चार्ली चॅप्लीन आणि जिम कॅरीशी केली तर तुला फारसं न पाहिलेल्या लोकांना वाटतं 'किरण माने जरा अतीच कौतुक करतोय.' मी जेव्हा कधी विनोदी नाटक बघतो, तेव्हा क्वचित कधीतरी 'हा रोल सतीश तारेने केला असता तर !?' हा विचार मनाला शिवला तरी मी पुढचं नाटक पाहू शकत नाही...! मी कुणाला कमी लेखत नाही. आजही चांगले-शैलीदार विनोदवीर आपल्यात आहेत, पण तरीही 'सतीश तारे' या अवलियाचे जबराट-छप्परतोड 'परफाॅरमन्सेस' ज्यांनी पाहिलेत, त्यांना माझं म्हणणं मनापास्नं पटंल. असो...तरीही आज मी लै लै लै हसणारय सतीश. खळखळून - मनापासून हसणारय.. कारण आज मी तुझं 'ऑल लाईन्स क्लीअर' हे नाटक बघणारय...डोळ्यात पाणी येईपर्यन्त हसणारय.
लैच लवकर गेलास रं भावा. एवढा 'टायमिंग'चा बाप तू ...पण 'जाण्याचं' टायमिंग चुकवलंस दोस्ता... तुला प्रत्यक्ष भेटून चिक्कार वेळा केलाय.. आज परत एकदा तुला कडकडीत सलाम. लब्यू, असे किरण मानेंनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
 

Web Title: you gone soon, Bhava ..., I missed the 'going' time, friend ... Kiran Mane's social media post goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.