Join us

'तुम्ही आम्हाला सोडून गेला असाल, पण...'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रतापला वडिलांच्या आठवणीत अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 10:09 AM

Prithvik Pratap : पृथ्वीक प्रताप जवळपास एक वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'(Maharashtrachi Hasyajatra)ने अनेक टॅलेंटेड विनोदवीर दिले. त्यातील एक विनोदवीर म्हणजे पृथ्वीक प्रताप (Pritvik Pratap). पृथ्वीकने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना खळखळून हसवले. आपली अशी एक वेगळी शैली त्याने प्रेक्षकांसमोर ठेवली आणि याच अतरंगी अभिनयाच्या जोरावर आज तो संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झाला. मात्र त्याचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. नुकतेच एका मुलाखतीत पृथ्वीकने त्याच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे.

पृथ्वीक प्रताप जवळपास एक वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं. नुकतेच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्याने वडिलांना एक इमोशनल फोन केला. त्यावेळी त्याने वडिलांचे आभार मानले. तो म्हणाला की, मला जन्म दिल्याबद्दल तुमचे आभार. आपले फारसे कधीच बोलणेच झाले नाही. तुम्ही प्रिंटींग प्रेसमध्ये कामाला होतात असे मला आईकडून समजले. तुमचे प्रिटींग प्रेसचा आयडी अजूनही माझ्याकडे आहे. ते मी पाकिटात ठेवतो. तुम्ही खूप कमी वेळ घरी असायचात. याचा आईला खूप त्रास व्हायचा. तुम्ही केईएम रुग्णालयामध्ये होता आणि आई पुण्यात होती. तेव्हा तुम्हाला भेटण्यासाठी आठवड्यातून एक किंवा दोनवेळा आईला मुंबईमध्ये यावे लागत होते. तेव्हा तिला जास्त त्रास व्हायचा. तुमची तिथे कोण काळजी घेणार की नाही ही चिंता तिला सतावत असायची. तुम्हाला ती पत्रं पाठवायची. पण आईला तुम्ही खूप सांभाळून घेतल्याबद्दल तुमचे आभार. यापुढे मी आईला सांभाळेन तुम्ही त्याची काळजी करु नका. मी सदैव तिच्याबरोबर आहे. 

पृथ्वीकला झाले अश्रु अनावरतो पुढे म्हणाला की, दादा आणि माझ्यासाठीच कदाचित तुम्ही आम्हाला सोडून गेला असाल. पण तुमचे जाणे निरर्थक ठरले नाही. जितकी लोक तुम्हाला ओळखतात तितक्या लोकांना माहिती आहे की तुम्ही माझे बाबा आहात. फक्त जमले तर कधीतरी या. एखाद्या चित्रपटात स्वर्गामध्ये असणारी व्यक्ती एखाद्या व्यक्तीला भेटते असे दाखवतात. तसे जर तुम्हाला कधी भेटता आले तर या. जास्त काही नाही फक्त एक मिठी मारा. डोक्यावर हात ठेवा आणि म्हणा अभिमान वाटतो जे करतोस ते करत राहा, चांगलं करतोस. पृथ्वीकला वडिलांबाबत बोलताना अश्रु अनावर झाले.

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रा