सुशांतसिंग राजपूतने अवघ्या 16 व्या वर्षी त्याच्या आईला गमावले. सुशांतच्या आईचा मृत्यू 2002 मध्ये झाला होता. जानेवारी 2016 मध्ये दिलेल्या एका इंटरव्ह्यूदरम्यान त्याने आईच्या मृत्यूला आयुष्यातील सर्वात दुखद क्षण म्हटले होते. सुशांतने इंस्टाग्रामवर शेवटची पोस्ट 3 जून रोजी शेअर केली होती. त्यात त्याने स्वतःचा आणि आईचा फोटो शेअर केला होता. त्यासोबत लिहीले होते की, "अश्रूंच्या थेंबांतून अंधुक होत जाणारा भूतकाळ. एकीकडे, कधीच अंत नसलेली स्वप्नं हास्याचं इंद्रधनु फुलवताहेत आणि त्याचवेळी समोर हे क्षणभंगुर जगणं. या दोन्हींमधून मी काय निवडायचं, आई?"
सुशांतने स्वतः वयाच्या 34 व्या वर्षी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत जगा निरोप घेतला. वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.त्यानंतर सोशल मीडियावर त्याचे जुने व्हिडीओ व्हायरल होत आहेत. समोर आलेला व्हिडीओत माधुरी दिक्षितलाही रडू कोसळल्याचे पाहायला मिळत आहे. 'झलक दिखला जा 4'चा व्हिडीओ आहे. या शोचा तो स्पर्धक होता.परफॉर्म झाल्यानंतर सुशांत आईच्या आठवणीत भावूक झाला होता. त्यावेळी त्याच्या आईशी निगडीत काही गोष्टी त्याने शेअर केल्या होत्या. तेव्हा तो म्हणाला होता की, ''छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आई खूप आनंदी असायची. आज ती राहिली असती तर हे सगळं बघून खूप खुश झाली असती''.
सुशांतने 'एमएस धोनी' आणि 'केदारनाथ'सारखे हीट सिनेमा दिले आहेत. यासोबतच आमिर खानच्या 'पीके'मधील कामाचेही कौतुक झाले. सध्या सुशांत एका सिनेमासाठी 5-7 कोटी रुपये चार्ज करत होता. सिनेमाशिवाय तो जाहिरात आणि शोजमधून कमाई करत होता.