कॉमेडी किंग कपिल शर्मा आपल्या शोच्या माध्यमातून रसिकांना खळखळून हसवतो. दर आठवड्याला या शोमध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार हजेरी लावत असतात. त्यांच्या आयुष्याशी संबंधित बर्याच गोष्टी चाहत्यांसह शेअर करतात. एकदा करण जोहरनेही शोमध्ये हजेरी लावली होती. या वेळी त्याच्याबरोबर काजोलही कपिलच्या शोमध्ये उपस्थित होती. यादरम्यान दोघांनी आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक रंजक कथा शेअर केल्या आणि आणि शोच्या संपूर्ण टीमसोबत बरीच मस्तीही केली रसिकांचेही भरघोस मनोरंजन केले.
पहिल्यांदाच शोमध्ये करणने त्याच्या आयुष्याविषयी घरातल्या व्यतिरिक्त कोणालाच माहिती नसलेल्या सगळ्या सिक्रेट्स सांगितल्या. कदाचिद ही पहिलीच वेळ असावी जिथे जाहिररित्या अशा प्रकारे करणने ते रहस्य सांगितले होते. यावेळी त्याने त्याच्या नावाविषयी एक सिक्रेट सांगितले, हे ऐकताच उपस्थितांनाही आश्चर्य वाटले असणार.
कोणी विचारही केला नसेल ती गोष्ट करणने पहिल्यांदाच सांगितली. जी यापूर्वी त्याने कधीच सांगितली नव्हती. पहिल्यांदाच त्याने त्याच्या नावाचा खुलासा केला होता. त्यावेळी त्याने सांगितले की, त्याचे खरे नाव करण जोहर नसून राहुल कुमार जोहर असे होते . जिथे माझा जन्म झाला आहे तिथे आजही मला राहुल कुमार म्हणूनच ओळखतात. जन्माच्या सहा दिवसानंतर माझ्या आईने माझे नाव करण असावे असे स्वप्न पाहिले होते. त्यानंतर माझे नाव बदलले गेले आणि राहुलच्या ऐवजी करण जोहर ठेवण्यात आले.
करण जोहरच्या पार्टीवर NCBची नजर
पार्टीमध्ये अशा बऱ्याच गोष्टी होताना दिसतायेत, ज्यामुळे या पार्टीत ड्रग्सचा वापर झाल्याचा संशय बळावला आहे. 27 जुलैला झालेल्या या पार्टीत एनसीबीला कोकेना घेतल्याचा संशय आहे. करण जोहरच्या या पार्टीत दीपिका पादुकोण, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, शाहिद कपूर, वरुण धवन, विकी कौशल सारख्या अनेक कलाकार सामील होते. या पार्टीचा व्हिडीओ करण जोहरने 28 जुलैला 2019ला शेअर केला होता.
NCBच्या रडारवर आता करण जोहरची 'ती' पार्टी, ड्रग्सचा वापर केल्याचा संशय
करण जोहरने सोशल मीडियावर प्रेस नोट जारी करून स्पष्टीकरण दिलं. त्याने लिहिलं की, 'काही न्यूज चॅनल्स, प्रिंट/इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चुकीची माहिती प्रकाशित करत आहेत की, मी माझ्या घरी २८ जुलै २०१९ ला आयोजित केलेल्या पार्टीत ड्रग्सचं सेवन केलं गेलं. मी आधीही सांगितलं आहे की, हे सगळे आरोप चुकीचे आहेत. मी पुन्हा सांतो की, हे आरोप निराधार आणि खोटे आहेत. पार्टीत कोणत्याही प्रकारच्या मादक पदार्थांच सेवन केलं गेलं नव्हतं. मी ना नशेच्या पदार्थांच सेवन करत ना त्यांना प्रमोट करत'.