'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेतील ओम आणि स्वीटू या व्यक्तिरेखांसोबतच इतर व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात. मालिकेतल्या कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे रसिकांचेही सगळेच आवडते कलाकार बनले. रसिक भरघोस पसंती देत असतात. आपल्या आवडत्या कलाकाराविषयी जाणून घेण्यात चाहत्यांनाही प्रचंड रस असतो.
मालिकेत आणखी एक व्यक्तिरेखा आहे ज्याने अल्पावधीतच रसिकांचे लक्ष वेधून घेतले. या सगळ्यांमध्ये एक जवळची वाटणारी व्यक्तिरेखा म्हणजे चिन्या. रिअल लाईफमध्ये चिन्या म्हणजे अर्णवच्या लोकप्रियतेत सुद्धा दिवसागणिक वाढ होत चालली आहे. मालिका जेव्हा लोकप्रिय होते तेव्हा त्या मालिकेतील कलाकारांची जबाबदारी अजून वाढते.
ही भूमिका साकारणे अर्णवसाठी आव्हानात्मक होते पण मालिका या माध्यमाबद्दल आणि त्यात काम करण्याच्या अनुभवाबद्दल त्याने सांगितले की,असा एक भाऊ हवा असं चिन्यांकडे बघून सगळ्यांना वाटतं. अभिनेता अर्णव राजे ही भूमिका अत्यंत चोख बजावतोय.
नुकतेच अर्णवने मालिकेत काम करत असताना त्याचा अनुभव आणि काही खासगी गोष्टीही चाहत्यांसह शेअर केल्या आहेत.मला अभिनयाची गोडी लहानपणापासूनच लागली होती. माझे वडील अभिनय क्षेत्रात असल्यामुळे अभिनयाचं बाळकडू लहानपणापासूनच मिळालं आहे. त्यांनी दिलेलं प्रोत्साहन माझ्यासाठी खूप मोलाचं आहे.
'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेच्या क्रिएटिव्ह प्रोड्युसर सुवर्ण राणे यांनी माझं एकांकिकेतील काम पाहिलं होतं. त्यामुळे मला या मालिकेत संधी मिळाली.मला सर्वजण म्हणतात कि मी चिन्यासारखाच आहे. पण खऱ्या आयुष्यात मी चिन्यांच्या अगदी उलट स्वभावाचा आहे.
त्यामुळे हे पात्र साकारताना मला बरीच मेहनत घ्यावी लागली अभिनेता म्हणून खऱ्या अर्थाने येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेमुळे ओळख मिळाली. चिन्यामुळे मी घराघरात पोहोचलो. माझ्या कुटुंबियांच्या प्रोत्साहनामुळे मला ऊर्जा मिळते. त्यांच्यामुळे मी स्वतःला सिद्ध करू शकलो. याच संपूर्ण श्रेय माझ्या कुटुंबाला आणि गुरूंना मी देतो.