'बिग बॉस ओटीटी 3' ला कालपासून शानदार सुरुवात झालीय. यंदाच्या नवीन सीझनचं होस्टिंग सलमान खानच्या ऐवजी अनिल कपूर करत आहेत. 'बिग बॉस ओटीटी 3'च्या घरात काल एकएक करुन स्पर्धक सहभागी झाले. या स्पर्धकांपैकी सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे युट्यूबर अरमान मलिक आणि त्याच्या दोन पत्नींची. यावेळी अनिल कपूर यांनी दोन पत्नींविषयी अरमानला काही प्रश्न विचारले. अरमानने या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली जी चर्चेत आहेत.
कोणासोबत बेड शेअर करशील? अरमान म्हणाला..
'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये अरमान त्याच्या पत्नी पायल आणि कृतिकासोबत सहभागी झालाय. यावेळी होस्ट अनिल कपूर यांनी अरमानला मजेशीर प्रश्न विचारले. या प्रश्नाचं उत्तर देताना अरमानला दोन पत्नींपैकी फक्त एकीला किस करुन तिची निवड करायची होती. अरमानला घरात कोणासोबत बेड शेअर करायला आवडेल विचारताच त्याने पहिली पत्नी पायलला किस करुन तिची निवड केली. शो जिंकताना कोणाला पाहायला आवडेल विचारताच त्याने कृतिकाला किस करुन तिला निवडलं. दोघींपैकी रोमँटिक कोण आहे विचारताच अरमानने पायलचे चुंबन घेऊन ती जास्त रोमँटिक आहे असं सांगितलं.
६ दिवसात अरमानने केलेलं दुसरं लग्न
'बिग बॉस ओटीटी 3' च्या मंचावर अरमानने दुसरं लग्न कसं केलं याविषयी खुलासा केला होता. दुसऱ्या पत्नीबद्दल बोलताना अरमान म्हणाला की, कृतिका ही अरमानची पहिली पत्नी पायलची मैत्रीण आहे. त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी कृतिका त्यांच्या घरी आली होती. कृतिका बाहेर फिरायला जाणार होती पण तिचा प्लॅन कॅन्सल झाला. त्यामुळे ती अरमानच्याच घरी राहिली. यादरम्यान अरमान कृतिकाच्या प्रेमात पडला आणि ६ दिवसात त्यांनी लग्न केलं. लग्न झाल्यानंतर अरमानने पहिली पत्नी पायलला कृतिकासोबतचे लग्नाचे फोटो पाठवले. पायलने सुरुवातीला स्वीकारलं नाही मात्र नंतर तिने दोघांच्या लग्नाला होकार दिला.