Join us

युवा सिंगर एक नंबरच्या स्पर्धकांना जजेसने दिले एक मोठे आव्हान,जाणून घेण्यासाठी क्लिक करा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 3:26 PM

इतर सर्व स्पर्धकांना शेवटच्या टप्प्यात कडक झुंज देऊ शकतात असे जजेस ना वाटले अशा स्पर्धकांना जजेसनी त्यांची निवड करताना त्यांच्या हृदयाला हात घालणारा एक पर्याय दिला.

'युवा सिंगर एक नंबर' या नव्याकोऱ्या कार्यक्रमाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या कार्यक्रमाची एक नवी आणि हटके संकल्पना हे या लोकप्रियतेचे मुख्य कारण आहे. स्पर्धकांसाठी वयाचे आणि संख्येचे कुठलेही बंधन नसणे, हा या संकल्पनेतील एक महत्त्वाचा मुद्दा आहे.पण त्याहून जास्त एक वेगळा प्रयत्न या वेळेला केला गेला आणि काही स्पर्धकांना विचारला गेला त्यांचे आयुष्य  बदलवून टाकणारा प्रश्न " पैसा की पॅशन ?"  

युवा सिंगर एक नंबर' ह्या कार्यक्रमात नवनवीन गोष्टी होत आहेत . त्याचप्रमाणे शो च्या पहिल्या आणि तिसऱ्या भागात जज वैभव मांगलेंनी आणि सावनी शेंडेने वाहिनीच्या फॉरमॅट प्रमाणे एक वेगळ्या प्रकारे स्पर्धकांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याची संधी दिली . या पर्यायासाठी  वाहिनीतर्फे दोन अतिशय उत्तम गाणारे स्पर्धक निवडले गेले  पहिल्या भागात चेतन लोखंडे आणि तिसऱ्या भागात शुभम मस्के हे दोघेही अतिशय उत्तम गाणारे गायक . जे इतर सर्व स्पर्धकांना शेवटच्या टप्प्यात कडक झुंज देऊ शकतात असे जजेस ना वाटले अशा स्पर्धकांना जजेसनी त्यांची निवड करताना त्यांच्या हृदयाला हात घालणारा एक पर्याय दिला. पहिला पर्याय होता , तुमची निवड झाली आहे मात्र या क्षणी ते स्पर्धेत राहून स्वतःचे नाव स्वतःच्या जिद्दीवर कमावू शकतात किंवा या निवडप्रक्रियेतून बाहेर पडत एक लाख रुपये घेऊन घरी जाऊ शकतात. 

दोघेही छोट्या गावातून स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. चेतन आणि शुभम हे दोघेही गुणवत्तेच्या जोरावर इथपर्यंत पोहोचले होते मात्र कधीकधी परिस्थिती प्रमाणे काही गोष्टींचा सारासार विचार करावा लागतो आणि एक निर्णय घ्यावा लागतो की कोणत्या गोष्टी आपल्याला आज महत्वाच्या आहेत . त्या प्रमाणे चेतन ने स्वतःच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवत एक लक्ष रुपये न घेता कार्यक्रमात स्वतःला सिद्ध करण्याची तयारी दर्शवली . 

शुभमच्या दृष्टीने सध्याच्या त्याच्या घरच्या परिस्थितीमुळे पैशाची गरज ही त्याच्या स्वप्नांपेक्षा मोठी ठरली . आज एक लक्ष रुपयामुळे त्याच्या अनेक महत्वाच्या गोष्टी मार्गी लागणार होत्या आणि ती त्याची आजची गरज होती . त्यामुळे सारासार विचार करत त्याने एक लक्ष रुपये निवडले मात्र जाताना त्याने युवा सिंगरच्या व्यासपीठाला एक वचन दिले , जरी आज मी पैसे निवडत असून तरीही पुढच्या वर्षी माझे गायक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या व्यासपीठावर मी पुन्हा येईन आणि स्वतःला सिद्ध करीन. जजेस नी सुद्धा दोन्ही स्पर्धकांच्या निर्णयाचे स्वागत केले .

 

टॅग्स :झी युवायुवा सिंगर एक नंबर