Join us

प्रिन्ससोबत घटस्फोटाच्या चर्चांवर युविकाचं पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "आमचा दोघांचाही नवा प्रवास..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 11:22 IST

प्रिन्स-युविका वेगळे होणार? अभिनेत्री म्हणाली...

युविका चौधरी (Yuvika Chaudhary) आणि प्रिन्स नरुला (Prince Narula) टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कपल आहे. बिग बॉसमध्ये असताना दोघंही प्रेमात पडले आणि बाहेर आल्यानंतर काही वर्षात त्यांनी लग्नही केलं. प्रिन्स बिग बॉस्चाय त्या सीझनचा विजेताही बनला होता. काही महिन्यांपूर्वीच युविकाने गोंडस लेकीला जन्म दिला. लग्नानंतर ६ वर्षांनी दोघं आईबाबा झाले. त्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेना झाला. पण या आनंदाच्या वेळीच दोघांमध्ये खटके उडाल्याच्या चर्चा झाल्या. दोघं घटस्फोट घेणार इथपर्यंत ही चर्चा झाली. यावर आता युविकाने अनेक दिवसांनंतर भाष्य केलं आहे.

युविका चौधरीने नुकतीच एका न्यूज पोर्टलला मुलाखत दिली. यावेळी ती म्हणाली, 'पालकत्व हा आम्हा दोघांसाठीही नवा प्रवास आहे. म्हणूनच आम्ही या चर्चांवर शांत होतो. प्रिन्स खूप भावनिक आहे आणि या चर्चांमुळे त्याच्यावर खूप परिणाम झाला. पण नेहमीच स्पष्टीकरण देणं गरजेचं नसतं असं आम्हाला वाटलं."

ती पुढे म्हणाली, "प्रिन्स व्यस्त आहे असं मी म्हणाले होते. माझ्या या वाक्याचा विपर्यास केला गेला. माझं म्हणणं होतं की तो कामात व्यस्त आहे. मी लेकीसह माझ्या आईच्या घरी राहत आहे याचीही खूप चर्चा झाली. पण आमच्या घरी काम सुरु असल्याने मी आईकडे राहत होते. मला हे सगळं सांगायची गरज वाटत नव्हती."

आमच्यात सगळं सुरळीत

युविका म्हणाली, "आयुष्यातला प्रत्येक टप्पा हा वेगळा असतो. मित्र, मग डेटिंग आणि नंतर लग्न. आता आम्ही पालक झालो आहोत. आम्ही एकत्र चांगले आणि वाईट दिवसही पाहिले आहेत. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर पुढे पुढे जात असताना आम्ही एकमेकांच्या आणखी जवळ येत आहोत. 

टॅग्स :युविका चौधरीप्रिन्स नरूलाघटस्फोटपती- जोडीदारटिव्ही कलाकारबिग बॉस