Join us

Video: धनश्रीच्या चेहऱ्याला मास्क, तर हुडी घालून पोहोचला चहल; बांद्रा कोर्टात होणार 'डिवोर्स'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 13:33 IST

Yuzvendra Chahal-Dhanashree Verma Divorce: युजवेंद्र आणि धनश्रीचा कोर्टाबाहेरील व्हिडिओ व्हायरल होत आहे

Yuzvendra Chahal-Dhanashree Verma Divorce: भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांचा आज बांद्रा कोर्टात घटस्फोट फायनल होणार आहे. घटस्फोटाच्या आधीचा कूलिंग पीरियड रद्द करण्यासाठी दोघांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावर कालच निर्णय झाला आणि आज कौटुंबिक न्यायालयात त्यांच्या घटस्फोटाची शेवटची प्रक्रिया होणार आहे. यासाठी युजवेंद्र चहल आणि धनश्री कोर्टात पोहोचले आहेत. युजवेंद्र हुडी घालून चेहरा लपवताना दिसला तर धनश्री मास्क घालून आली. कोर्टाबाहेरील त्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांचा घटस्फोट गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चेत आहे. युजवेंद्र धनश्रीला ४.५ कोटी पोटगी देणार असल्याचीगही बातमी आली. आता नुकतंच दोघंही मुंबईतील बांद्रा कौटुंबिक न्यायालयात पोहोचले आहेत. त्यांच्या घटस्फोटाची शेवटची प्रक्रिया थोड्याच वेळात पार पडणार आहे. युजवेंद्र चहल ब्लॅक हुडी, तोंडाल मास्क लावून कोर्टात पोहोचला. तर धनश्री वर्मा पांढरा टॉप, निळी जीन्स आणि चेहऱ्याला काळा मास्क लावून आली. दोघंही खाली मान घालून सरळ आत गेले. मात्र यावेळी धनश्रीसमोर चालताना पापाराझींनी गर्दी केली. एक व्हिडिओग्राफर खालीही पडला. तेव्हा धनश्री 'काय करताय यार?' असं म्हणत पापाराझींवर भडकली. युजवेंद्र आणि धनश्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल २०२० साली लग्नबंधनात अडकले होते. लग्नानंतर ५ वर्षांनी त्यांचा घटस्फोट होत आहे. गेल्या अडीच वर्षांपासून दोघंही वेगवेगळे राहत असल्याचा खुलासा त्यांनी काल कोर्टात केला. दुसरीकडे युजवेंद्र चहलच्या आर जे महावशसोबत अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

टॅग्स :युजवेंद्र चहलघटस्फोटसेलिब्रिटीमुंबईन्यायालय