Join us

Appi Amchi Collector : फक्त तुमच्या कौतुकाच्या दोन शब्दांसाठी...;‘अप्पी आमची कलेक्टर’च्या अर्जुनची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 3:54 PM

Appi Amchi Collector , Rohit Parshurm : ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेतील अप्पी सोबतच अर्जुन हे पात्र देखील भलतंच भाव खाऊन जातंय. अभिनेता अर्जुनची भूमिका रोहित परशुरामने साकारली आहे. याच रोहितची एक पोस्ट सध्या व्हायरल होतेय.

झी मराठीवर नुकत्याच सुरू झालेल्या ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. अप्पी ही एक खेड्यात राहणारी मुलगी. तिथे तिला कुठलंच मार्गदर्शन मिळत नाही.पण तिचं ध्येय खूप मोठं आहे.  अनेक आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करुन ती कलेक्टर होते. अशी ही संघर्ष कथा प्रेक्षकांना भावते आहे.  या मालिकेतील अप्पी सोबतच अर्जुन हे पात्र देखील भलतंच भाव खाऊन जातंय. अभिनेता अर्जुनची भूमिका रोहित परशुरामने साकारली आहे. याच रोहितची एक पोस्ट सध्या व्हायरल होतेय.

रोहित परशुराम याने नुकतंच एक फायटिंग सीन शूट केला. हा सीन पृथ्वी आणि अर्जुन यांच्यात शूट करण्यात आला.  पृथ्वी अप्पीचा अपमान करतो आणि अर्जुन याचा बदला घेतो. हा फायटिंग सीन चिखलात शूट करण्यात आला. याचा एक बीटीएस व्हिडीओ रोहितने शेअर केला आहे. सोबत या फायटींग सीनचे काही फोटो शेअर करत, त्याने एक भलीमोठी पोस्टही लिहिली आहे.   7 तास चाललेलं शूट, लाल झालेले डोळे, हातापायांना झालेल्या जखमा आणि राबलेले शेकडो हात फक्त तुमच्या कौतुकाच्या 2 शब्दांसाठी आहेत रसिक मायबाप प्रेक्षकहो, असं त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

 रोहितची पोस्ट

 "रोह्या बरं आहे बाबा तुझं, मस्त शूटिंग करायची, फोटो काढायचे आणि आरामात राहायचं...""आम्हाला पण बघ की काय असेल तर असं सोप्प काहीतरी..""तुमचं काय बाबा, निवांत काम आहे तुमचं..""मजा आहे बाबा तुमची.."ह्या क्षेत्रात आल्यापासून ही आणि अश्या संदर्भाची वाक्य गेल्या ४ वर्षांत मी खूप ऐकली आहेत आणि ऐकतोय. खरंच आज खूप मनापासून सांगावसं वाटतंय, ह्या क्षेत्रात पण जिवाचं रान, रक्ताचं पाणी आणि ह्याच भावकितले वाक्यप्रचार वापरून कराव्या लागणाऱ्या सगळ्या गोष्टी खूप प्रामाणिकपणे कराव्या लागतात.प्रचंड कष्ट आणि त्याग असलेल्या ह्या क्षेत्रात दुर्दैवाने फक्त कॅमेऱ्यासमोर असलेले आम्ही so called Hero भाव खावून जातो पण त्यामागे काम करणारं संपूर्ण युनिट हे खरं HERO म्हणवून घेण्यास जास्त योग्यतेचं आहे असं माझं आता फायनल ओपिनियन झालं आहे.ह्या fight sequence च्या shoot च्या वेळी  आशुतोष बावीसकर सर जेव्हा आमच्या आधी जाऊन चिखलात उभे होते तेव्हाच कळलं की हा ध्येयवेडा माणूस आज काहीतरी अफलातून घडवून आणणार आहे ! आणि झालंही तसंच.... मराठी टीव्ही सीरियल च्या इतिहासच क्वचितच असा fight sequence शूट झाला असेल.आम्ही फक्त चिखलात भरलो होतो पण सेट वरचा प्रत्येक व्यक्ती त्या वेळी प्रचंड दबावात संपूर्णपणे आमची काळजी घेत होता, आम्हाला काही ईजा होऊ नये ह्यासाठी धडपडत होता. ७०-८० जणांचा पूर्ण स्टाफ आम्हा दोघांकडे लक्ष देऊन होता, किती वेळा डोळ्यांत चिखल गेला तर कितीतरी वेळा कानात. दम लागत होता, क्वचित एखादा खडा हातात शिरत होता पण सेट वर आमची काळजी घेणारा प्रत्येकजण ते स्वतः अनुभवत होता. Tissue, पाणी, गरम पाणी, चहा, sanitizer , Dettol सगळं सगळं कसं तयार होतं.सगळ्यांनी लहान बाळासारखी आमची काळजी घेतली म्हणून हा scene एवढा effectively शूट होऊ शकला.म्हणूनच मला वाटतं की ह्या सेट वरचा प्रत्येक जण खरा हिरो आहे.प्रत्येक जण अर्जुन आहे !  ७ तास चिखलात चाललेलं शूट, लाल झालेले डोळे, हातापायांना झालेल्या जखमा आणि राबलेले शेकडो हात फक्त तुमच्या कौतुकाच्या २ शब्दांसाठी आहेत रसिक मायबाप प्रेक्षकहो, तुम्हाला विनंती आहे की आज संध्याकाळी नक्की बघा  

टॅग्स :झी मराठीटिव्ही कलाकारटेलिव्हिजन