Join us

‘झी मराठी अ‍ॅवॉर्ड्स २०१८’मध्ये ‘तुला पाहते रे’ने उमटवली मोहोर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 1:35 PM

यावर्षी ‘लागिरं झालं जी’, 'बाजी', 'माझ्या नवऱ्याची बायको', 'तुला पाहते रे' आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली. महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी ‘झी मराठी’ने यावर्षी एकोणीस वर्ष पूर्ण केली.

दिवाळीचा सण जवळ आला की प्रेक्षकांना उत्सुकता असते ती ‘झी मराठी अवॉर्डस’च्या रंगतदार आतिषबाजीची. या सोहळ्यात कोणती व्यक्तिरेखा सर्वोत्कृष्ट ठरणार? लोकप्रिय नायक, नायिकेच्या पुरस्काराची विजयी माळ कुणाच्या गळ्यात पडणार? लोकप्रिय मालिकेचा मान कुणाला मिळणार? असे उत्सुकतापूर्ण प्रश्न सर्वांच्या मनात असतात. अशीच उत्सुकता यंदाही प्रेक्षकांना आहे. यावर्षी ‘लागिरं झालं जी’, 'बाजी', 'माझ्या नवऱ्याची बायको', 'तुला पाहते रे' आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली.

महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी ‘झी मराठी’ने यावर्षी एकोणीस वर्ष पूर्ण केली. एकोणीस र्वष म्हणजे एका अर्थाने नवतारुण्यात पदार्पण. त्यामुळेच यावर्षी ‘उत्सव नात्यांचा’ घेऊन ‘झी मराठी अ‍ॅवॉर्डस’चा सोहळा अतिशय रंगतदार पद्धतीने पार पडला. ज्यामध्ये पुरस्कार पटकावत ‘तुला पाहते रे’ने ९ पुरस्कार पटकावत बाजी मारली. त्यापाठोपाठ ‘माझ्या नवऱ्याची बायको’मालिकेनेही ५ पुरस्कार मिळवत आपला ठसा उमटवला. तसेच स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेला एक विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. प्रेक्षकांच्या मतांद्वारे निवडण्यात येणाऱ्या या पुरस्कारांसाठी यंदा भरघोस मतदानही झाले. ‘झी मराठी’वरील मालिकेतील प्रमुख जोड्यांचे रंगतदार नृत्य सादरीकरण, कलाकारांची आगळी वेगळी अंताक्षरी, बालकलाकारांची धूम, ‘चला हवा येऊ द्या’ च्या कलाकारांनी उडवून दिलेली धम्माल आणि जोडीला अभिजीत खांडकेकर आणि संजय मोनेसारख्या अनुभवी कलाकारांनी आपल्या निवेदनातून केलेल्या तुफान फटकेबाजीने हा कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर नेला. सळसळता उत्साह आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडलेला हा सोहळा येत्या रविवारी, २८ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजता ‘झी मराठी’  वाहिनीवर प्रसारित होणार आहे. 

टॅग्स :तुला पाहते रेसुबोध भावे गायत्री दातार