बापरे..! मन उडू उडूच्या सेटवर अभिनेत्रीने फेकून मारलेला ग्लास चुकून लागला तेव्हा...व्हिडीओ झाला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 04:35 PM2022-03-17T16:35:49+5:302022-03-17T17:09:53+5:30
सध्या या मालिकेत सानिका आणि कार्तिकच्या लग्नाची बातमी देशपांडे कुटुंबासमोर आली आहे. या घटनेमुळे सध्या देशपांडे आणि साळगावकर कुटुंबामध्ये तणावाचे वातावरण आहे.
छोट्या पडद्यावर गाजत असलेली मालिका म्हणजे मन उडू उडू झालं. आतापर्यंत या मालिकेचे अनेक भाग झाले असून प्रत्येक भागात एक नवी कथा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. सध्या या मालिकेत सानिका आणि कार्तिकच्या लग्नाची बातमी देशपांडे कुटुंबासमोर आली आहे. या घटनेमुळे सध्या देशपांडे आणि साळगावकर कुटुंबामध्ये तणावाचे वातावरण आहे. हा सीन शूट करत असताना सेटवर एक प्रसंग घडला. सानिकाने हा सीन शूट करतानाचा घडलेला एक मजेशीर किसा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
सानिकाने तिच्या मालिकेमधील आईला बुमराह’ची उपमा दिली आहे. सानिका अर्थात रीना मधुकर( Reena Madhukar ) सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. रीनाने सेटवरच एक व्हिडीओ शेअर केला आहे.
मालिकेत सानिकाच्या वागण्यामुळे तिच्या आईच्या राग अनावर होतो. रागाच्याभरात त्या टेबलावरचा ग्लास उचलतात आणि तिच्या अंगावर फेकतात. हा सीन शूट करताना रुपलक्ष्मी यांनी रीनाच्या अंगावर फेकलेला ग्लास खरंच त्याचा पायाला लागतो. ग्लास चुकून लागल्याचे लक्षात येताच त्या रीनाकडे धावताना दिसतात. हा व्हिडीओ शेअर करताना आई ने केली bowling उडवला माझा leg stump! अशे stunts वाले scenes करताना धड धड होतो heart pump! असं कॅप्शन दिलं आहे.