Join us

‘रोज साडे सातला हे रडारड सुरू करतात...’, ‘Man Udu Udu Zhala’चा इमोशनल ट्रॅक पाहून वैतागले प्रेक्षक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 2:09 PM

Man Udu Udu Zhala : मागच्या काही दिवसांपासून मालिकेत केवळ आणि केवळ इमोशनल सीन्स प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. इमोशनल सीन्सचा हा ओव्हरडोस कदाचित प्रेक्षकांच्या डोक्याला ताप देणारा ठरत आहे.

झी मराठीवरील ( Zee Marathi)  ‘मन उडू उडू झालं’  ( Man Udu Udu Zhala) या मालिकेतील नवा  ट्विस्ट पाहायाला मिळतोय. तो सुद्धा अगदीच इमोशनल. इंद्रा-दीपूच्या प्रेमाचं सत्य देशपांडे सरांसमोर आले असून देशपांडे सरांनी दोघांचं प्रेम स्वीकारण्यास नकार दिला आहे. जयश्रीने इंद्राला घराबाहेर काढले आहे. पण आता जयश्री आणि इंद्रामधला दुरावा दीपू दूर करणार आहे.

इंद्राने दीपूसाठी अनेक अडथळ्यांचा सामना केला आहे आणित दीपूला याची जाणीव आहे. त्यामुळे तिने इंद्रासोबत राहण्याचा व त्याची काळजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. सत्तूच्या छोट्याशा घरात इंद्रा व दीपू राहत आहे. पण एकमेकांसोबत असूनही रडारड मात्र सारखी सुरू आहे आणि याचमुळे सध्या ही मालिका ट्रोल होतेय.

होय,   मागच्या काही दिवसांपासून मालिकेत केवळ आणि केवळ इमोशनल सीन्स प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. इमोशनल सीन्सचा हा ओव्हरडोस प्रेक्षकांच्या डोक्याला ताप देणारा ठरत आहे. सोशल मीडियावर अनेक युजर्सनी याबद्दलची नाराजी व्यक्त केली आहे.   दीपू साळगावकरांच्या घरी जाते आणि जयश्रीला इंद्राकडे घेऊन येते. जयश्री स्वत:च्या हातानं बनवलेलं जेवण इंद्राला खावू घातले. यावेळी माय लेकाचा अत्यंत भावूक क्षण दाखवण्यात येणार आहे. मालिकेचा हा प्रोमो पाहून अनेकांनी मालिकेला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. 

‘बंद करा मालिका. प्लीज काही पण वाढवून ठेवलीये. फालतू करून ठेवलीये. बंद करा लवकर,’ अशा शब्दांत एका युजरने नाराजी व्यक्त केली आहे. ‘असं म्हणतात की संध्याकाळी रडू नये कारण घरात लक्ष्मी येते पण रोज साडेसात ला हे रडारड सुरू करतात! डोक्याला ताप!’, अशा शबदांत एका युजरने आपला संताप व्यक्त केला आहे. ‘पाणी ओता रे संघटनेचा अवार्ड या मालिकेला देण्यात येत आहे. पाणचट झालीये. आता बंद करा फालतुपणा’ अशा शब्दांत एका युजरने मालिकेला ट्रोल केलं आहे. ‘दीपू किती ओव्हर अ‍ॅक्टिंग करते रडण्याची. खोटं वाटतं तिचं रडणं. इतकं खोटं की तिच्याकडे पाहून हसायला येतं,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे.

काही चाहत्यांनी मात्र मालिका सुंदर असल्याचं म्हटलं आहे. इंद्रा म्हणजे इंद्राच नाही, इंद्रा सर्वांचा डॅशिंग हिरो हाय, अशा शब्दांत एकाने इंद्राचं कौतुक केलं आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनझी मराठीसोशल मीडिया