Punha kartavya Aahe: टेलिव्हिजन हे भारतीयांचं आवडतं मनोरंजनाचं साधन आहे. टीव्हीवरील अनेक मालिका लोकप्रिय ठरल्या. पण, आता चित्र आता बदललं आहे. छोट्या पडद्यावर प्रसारित होणाऱ्या मालिकांचं यश हे त्यांच्या लोकप्रियतेवर ठरत नसून टीआरपीवर ठरत असते. त्यामुळे वाहिन्यांवर टीआरपीच्या दृष्टीने अनेक बदल करण्यात येतात. कधी जुन्या कलाकांराची एक्झिट तर कधी नव्या कलाकारांची एन्ट्री असे बरेच प्रयोग करण्यात येतात. दरम्यान, आता झी मराठीवरील एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचं नाव आहे पुन्हा कर्तव्य आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यामध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर आता वर्षभरात 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.
अभिनेत्री अक्षया हिंदळकर आणि अक्षय म्हात्रे यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका अनेकांच्या पसंतीस उतरली होती. पुन्हा कर्तव्य आहे मधील आकाश आणि वसुंधराची जोडीला प्रेक्षकांना भरभरून प्रेम दिलं. शिवाय मालिकेलाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत होता. कौटुंबिक कथेवर आधारित ही मालिका लवकरच बंद होणार आहे. मालिकेतील मुख्य अभिनेत्री अक्षया हिंदळकरने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर करत संकेत दिले आहेत. अक्षयाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पुन्हा कर्तव्य आहे मालिकेच्या सेटवरचा एक फोटो पोस्ट केली आहे. आज पाऊल निघत नव्हतं. चला निरोप घेते…, अशा आशयाची पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
त्यासोबतच मालिकेच्या शेवटच्या चित्रणीकरणादरम्यानचा फोटो पोस्ट करत तिने लिहिलंय, मला आता या क्षणाला काय वाटतंय ते मी खरंच शब्दात सांगू शकत नाही. पण, मला या प्रवासात खूप चांगली माणसं भेटली. त्यांच्या अनेक आठवणी माझ्याबरोबर घेऊन मी चालले आहे. खूप प्रेम...," अशी भावुक पोस्ट अभिनेत्रीने शेअर केली आहे.