टीव्हीवरच्या मालिका म्हणजे, गृहिणींच्या जिव्हाळ्याचा विषय. अनेक मालिका येतात आणि येताच हिट होतात, ते याचमुळे. साहजिकच, या मालिकांची चर्चा सोशल मीडियावरही होते. सध्या अशाच एका मालिकेची चर्चा सोशल मीडियावर रंगलीये. अर्थात एका वेगळ्या कारणानं. होय, ‘मन झालं बाजिंद’ ही मालिका सध्या सोशल मीडियावर ट्रोल होतेय. कारण काय तर मालिकेतील घोडचूक. याआधीही ही मालिका अशीच ट्रोल झाली होती.गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो. पण ‘मन झालं बाजिंद’ (Man Zhala Bajind) या मालिकेत पहिल्यांदाच प्रेमाचा रंग पिवळा दाखवण्यात आला आहे. यामुळे ही मालिका तशीही चर्चेत आहे. आता मालिकेत अशी एक चूक झाली की, तिची चर्चा सोशल मीडियावरही झाली.
कृष्णा बेशुद्ध अवस्थेत असताना तिच्या डोक्याला उजव्या बाजूला दुखापत झालेली दाखवण्यात आली होती. पण तीच कृष्णा शुद्धीवर आल्यावर तिच्या डोक्याच्या डाव्या बाजूला जखम दाखवण्यात आली होती. नेटक-यांनी नेमकी हीच चूक हेरली आणि मालिका ट्रोल झाली. यावरचे अनेक मीम्स सध्या व्हायरल होत आहेत.
या मालिकेत आता कुठे हळूहळू राया आणि कृष्णा यांच्यातील प्रेम फुलू लागलं आहे. परंतु, कृष्णावर येणारी संकट मात्र जराही कमी झालेली नाहीत. लग्नाच्याच दिवशी कृष्णावर मोठं संकट कोसळलं होतं. या अपघातातून कृष्णा थोडक्यात बचावली होती.
मामा-मामीच्या घरी फुलासारखी वाढलेली, सी.ए. होण्याचं स्वप्नं पाहणारी, हुशार, सावरून घेणारी, मांडणी करणारी, संयमी, विचार करून कृती करणारी अशी कृष्णा यांच्या बाजिंद्या प्रेमाची ही गोष्ट आहे.