Join us

Tu Tevha Tashi : मुक्ता बर्वेच हवी होती..., ‘तू तेव्हा तशी’ ट्रोल झाली....!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 18:24 IST

Tu Tevha Tashi : 'तू तेव्हा तशी' मालिकेचा पहिलाच भाग पाहून नेटकऱ्यांच्यातून उमटल्या अशा काही प्रतिक्रिया

झी मराठीवर नुकतीच एक नवी कोरी मालिका सुरू झालीये. मालिकेचं नाव काय तर ‘तू तेव्हा तशी’ ( Tu Tevha Tashi ).  मालिकेची अगदी पहिल्या झलकेपासूनच या मालिकेची प्रेक्षकांमध्ये चर्चा चालू झाली होती. या मालिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांना स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आणि शिल्पा तुळसकर (Shilpa Tulaskar)  ही जोडी पाहायला मिळणार असल्यानं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता मालिका सुरू झाल्यावर प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया आहे तर प्रेक्षकांना मालिका आवडलीये. अर्थात काहींची नाराजीही आहे. होय,  निवड चुकली, असं म्हणत काही लोकांनी या मालिकेला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला आहे.

स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर या नव्या कोऱ्या जोडीची पडद्यावरची काहींना प्रचंड आवडली. पण काहींनी मात्र शिल्पा तुळसकरच्या निवडीवरून मालिकेला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मुक्ता बर्वेचं हवी होती, चॉईस चुकली, अशी कमेंट एका चाहत्याने केली. काहींनी मात्र या मालिकेचं भरभरून कौतुक केलं आहे. मस्तच, भारी... सुंदर मालिका अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

स्वप्निल जोशी चार वषार्नंतर छोट्या पडद्यावर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  जीवलगा  ही त्याची शेवटची मालिका होती. स्वप्निल सध्या  चला हवा येऊ द्या  या कॉमेडी शोचा एक भाग आहे. तो या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. तर दुसरीकडे, शिल्पा तुळस्करही शेवटची  तुला पाहते रे  या मालिकेमध्ये सुबोध भावेसोबत दिसली होती.

अशी आहे कथाकॉलेजमध्ये मैत्री असलेली अनामिका आणि सौरभ यांची कित्येक वषार्नंतर पुन्हा एकदा भेट घडून येते. अनामिका ही इंटेरिअर डिझाइनर आहे तर सौरभ त्याच्या कामानिमित्त मुंबईला गेलेला असतो. इथेच या दोघांची  भेट घडून येते. आपले काम आटोपून हे दोघेही अनामिकाच्या गाडीने पुण्याला येतात. त्यावेळी सौरभने त्याच्या वहिनीसाठी घेतलेलं गिफ्ट अनामिकाच्या गाडीत विसरतो. यामुळे या दोघांची पुन्हा एकदा भेट घडून येणार आहे. या मालिकेत अभिज्ञा भावे, अभिषेक रहाळकर, सुनील गोडबोले आणि सुहास जोशी यांच्या देखील महत्वाच्या भूमिका आहेत. 

टॅग्स :स्वप्निल जोशीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार