Join us

‘तुझसे है राबता’च्या सेटवर सेहबान अझीमने रीमन शेखला दिले मोटार चालविण्याचे धडे!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 3:20 PM

हे दोन्ही कलाकार सेटवर एकमेकांशी अखंड गप्पा मारीत असतात, एकमेकांची छायाचित्रे काढतात, एकत्र जेवतात आणि नेहमी एकत्रच फिरतात. पण आता या मैत्रीच्या नात्याचे रुपांतर गुरु-शिष्याच्या नात्यात होत असल्याचे दिसून येते.

टीव्ही मालिकांतील  सहकलाकारांमधील खटके आणि भांडणांची चर्चा नेहमीच होत असते. म्हणूनच एखाद्या मालिकेतील दोन कलाकारांमधील पडद्यावरचे आणि पडद्यामागीलही संबंध सौहार्दाचे आणि प्रेमाचे आहेत, हे ऐकून मनाला दिलासा मिळतो. ‘झी टीव्ही’वरील ‘तुझसे है राबता’ या मालिकेतील कल्याणी (रीम शेख) आणि मल्हार (सेहबान अझीम) यांच्यातील नाते हे निव्वळ सहकलाकाराचे न राहता दोघांमध्ये मैत्रीचे धागे घट्ट विणले गेले आहेत. 

हे दोन्ही कलाकार सेटवर एकमेकांशी अखंड गप्पा मारीत असतात, एकमेकांची छायाचित्रे काढतात, एकत्र जेवतात आणि नेहमी एकत्रच फिरतात. पण आता या मैत्रीच्या नात्याचे रुपांतर गुरु-शिष्याच्या नात्यात होत असल्याचे दिसून येते. त्याचे असे झाले की सेहबान आणि रीम हे विविध ठिकाणी पर्यटन करण्यासंबंधी बोलत होते आणि मोटारीतून सर्व निसर्गरम्य ठिकाणी फिरण्यावर त्यांच्यात चर्चा सुरू होती. तेव्हा रीमने सांगितले की तिला मोटार चालविता येत नाही. हे ऐकून सेहबानला फार नवल वाटले. पण तेव्हा सेहबानने मोटार चालविण्याचे महत्त्व आणि फायदे तिला सांगितले आणि सेटवरील मोकळ्या वेळेत तिला मोटार चालविण्यास आपण शिकवू असेही आश्वासन दिले! 

यासंदर्भात रीम शेख म्हणाली, “सेहबानबरोबर चर्चा करीत असताना मला जाणवलं की आजच्या काळात मोटार चालविता येणं ही महत्त्वाची गोष्ट आहे, पण त्याकडे मी आजवर फारसं लक्षच दिलं नव्हतं. माझ्या वडिलांनीही मला पूर्वी मोटार चालविण्यास शिकविण्याचा प्रयत्न केला होता, पण तेव्हाही मी त्याकडे गांभीर्याने पाहिलं नव्हतं. पण आता सेहबानने मला मोटार चालविण्यास शिकविण्यचं वचन दिलं असून तो स्वत: उत्तम मोचटार चालवितो. आता सेटवर आम्हाला मोकळा वेळ मिळताच तो मला मोटार चालविण्यास शिकविणार आहे. मला मोटार शिकविताना सेहबानला  मनावर खूप नियंत्रण ठेवावं लागतं, पण मीसुध्दा मोटार ड्रायव्हिंग शिकूनच घ्यायचं असा निर्धार केला आहे. मोटार शिकताना मला खूपच उत्साह वाटतो आणि सेटवर आम्ही ज्या इतर धमाल करतो, त्यात आता मोटार ड्रायव्हिंग शिकण्याची भर पडली आहे.”

यावर सेहबानने सांगितले, “वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायला मला फार आवडतं. मोटारीतून दूरच्या ठिकाणी पर्यटनाला जाण्याची मला आवड आहे. रीमशी बोलत असताना मला कळलं की तिला मोटार चालवायला येत नाही. ते ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं. पण तेव्हा मी तिला मोटार चालविण्यास शिकविण्याचा निर्णय घेतला कारण आजच्या काळात मोटार चालवायला येणं हे महत्त्वाचं आहे. मोटार चालवायला येणं ही उपयुक्त कला आहे कारण त्यामुळे तुम्हाला कुठेही जाण्याचं स्वातंत्र्य मिळतं. आता चित्रीकरणादरम्यानच्या मोकळ्या वेळेत सेटवर तिला ड्रायव्हिंग शिकविताना आणखी एक धमाल सुरू होईल. पण तिला ड्रायव्हिंग शिकविण्यास मी खूप उत्सुक झालो आहे.” 

टॅग्स :झी टीव्ही