Join us

इंडियन आयडलच्या सलमान अलीचा परफॉर्मन्स पाहून झीनत अमान यांना आली या अभिनेत्याची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 8:30 AM

इंडियन आयडल या कार्यक्रमाच्या यंदाच्या भागात अभिनेत्री झीनत अमन हजेरी लावणार आहेत. त्यांनी नुकतेच या कार्यक्रमासाठी चित्रीकरण केले. हा कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्याचा त्यांचा अनुभव खूपच छान असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देइंडियन आयडल १० मधील आजपर्यंतचा उत्कृष्ट गायक असलेल्या सलमान अलीने 'आपका क्या होगा...' आणि 'खैयके पान' हे गाणे गायले. हे गाणे ऐकून झीनत इतक्या खूश झाल्या की, काही काळासाठी त्यांना त्या काळातच गेल्यासारखे वाटले. लमान हा खूपच छान गायक आहे. तो गाताना त्याच्यातील एनर्जी ही कौतुकास्पद होती. त्याला परफॉर्म करताना पाहून मला अमितजींची (अमिताभ बच्चन) आठवण आली असे झीनत अमान म्हणाल्या.

इंडियन आयडलच्या या सिझनला देखील प्रेक्षकांची तितकीच पसंती मिळत आहे. या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक एकाहून एक सरस गाणी सादर करत आहेत. आता खूपच कमी स्पर्धक शिल्लक असून या मधून कोण विजेता ठरतोय याची सगळयांना उत्सुकता लागलेली आहे. या कार्यक्रमाच्या मंचावर दर आठवड्याला बॉलिवूडमधील सेलिब्रेटी आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तसेच या स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी येत असतात. 

इंडियन आयडल या कार्यक्रमाच्या यंदाच्या भागात अभिनेत्री झीनत अमन हजेरी लावणार आहेत. त्यांनी नुकतेच या कार्यक्रमासाठी चित्रीकरण केले. हा कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्याचा त्यांचा अनुभव खूपच छान असल्याचे त्यांनी सांगितले. झीनत अमान यांनी त्यांच्या काळात एकाहून एका सरस चित्रपटात काम केले आहे. त्यांच्यावर चित्रीत झालेली अनेक गाणी गाजली आहेत. त्यामुळे इंडियन आयडलच्या स्पर्धकांनी त्यांच्या कारकिर्दीतील प्रसिद्ध गाणी सादर केली आणि त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या केल्या.

इंडियन आयडल १० मधील आजपर्यंतचा उत्कृष्ट गायक असलेल्या सलमान अलीने 'आपका क्या होगा...' आणि 'खैयके पान' हे गाणे गायले. हे गाणे ऐकून झीनत इतक्या खूश झाल्या की, काही काळासाठी त्यांना त्या काळातच गेल्यासारखे वाटले. हे गाणे ऐकल्यावर त्या म्हणाल्या, "सलमान हा खूपच छान गायक आहे. तो गाताना त्याच्यातील एनर्जी ही कौतुकास्पद होती. त्याला परफॉर्म करताना पाहून मला अमितजींची (अमिताभ बच्चन) आठवण आली आणि मला एकदम त्या काळातच गेल्यासारखे वाटले. मुळत: हे गाणे चित्रपटात नव्हते. पण डॉन या चित्रपटाचे लेखक सलीम-जावेद यांनी शेवटच्या क्षणाला ते गाणे चित्रपटात टाकण्याचा निर्णय घेतला."

झीनत अमान यांना सगळ्याच गायकांचे आवाज खूप आवडले. सलमानच्या तर त्या गायनाच्या प्रेमात पडल्या होत्या असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

झीनत अमान यांचा इंडियन आयडलमधील हा भाग प्रेक्षकांना येत्या शनिवारी आणि रविवारी रात्री आठ वाजता सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :इंडियन आयडॉलझीनत अमानअमिताभ बच्चन