Join us

आनंदाला उरला नाही पारावर, छोट्या तेनालीच्या आगमनानं वातावरणात उत्साह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 2:48 PM

छोट्या तेनालीला काहीही त्रास होऊ नये अशी काळजी सारेच घेतायत.. मात्र उत्साहाचं इतकं भरतं आलंय की त्याला कसं पकडावं हेही कोणाला उमजत नाही.

किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला....या गाण्यांच्या ओळीप्रमाणे काहीशी अवस्था झालीय या मालिकेतल्या निया शर्माची कारण त्यांच्या घरी आला एक छोटा पाहुणा...त्याच्या आगमनानं सारं वातावरण आनंददायी झालंय...इतकेच नाही तर तेनालीच्याही आनंदाला पारावर उरलेला नाही.छोट्या तेनालीला काहीही त्रास होऊ नये अशी काळजी सारेच घेतायत.. मात्र उत्साहाचं इतकं भरतं आलंय की त्याला कसं पकडावं हेही कोणाला उमजत नाही.

आजपर्यंत 'तेनाली रामा' या मालिकेच्या कथेत आजवर अनेक टि्वस्ट अॅण्ड टर्न्स आले आहेत. या मालिकेत नुकतीच शारदा गरोदर होती. आता लवकरच प्रेक्षकांना या मालिकेत एका छोट्या पाहुण्याच्या आगमनाचं सरप्राइज मिळणार आहे. छो्ट्या तेनालीच्या आगमनाने मालिकेतील वातावरण अधिक उत्साहपूर्ण झाले आहे. त्यातच रामाच्या विनोदाची भर पडल्याने प्रेक्षक या ऐतिहासिक मालिकेच्या अधिकच प्रेमात पडतील.

मागील आठवड्यात रामाच्या बायकोच्या ओटीभरण्याचा कार्यक्रम पार पडला. या मालिकेत नवा आनंद, नवा उत्साह पाहायला मिळतो आहे.छोटा पाहुणा आल्यामुळे सर्व कलाकारांमध्ये वेगळाच आनंद पाहायला मिळत आहे.तसेच एकमेकांमध्ये प्रेमाचे बंधही अधिक घट्ट झाले आहेत. कॅमेऱ्यासमोर आणि कॅमेऱ्याच्या मागेही या छोट्या पाहुण्याने आपल्यासोबत असावे यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील  असतो. आता मालिकेच्या आगामी भागात छोटा तेनाली आपल्या गमतीजमतींनी मनोरंजनाचा डोस वाढवत प्रेक्षकांना नक्कीच मंत्रमुग्ध करेल.

छो्ट्या तेनालीच्या आगमनाबद्दल तेनाली रामाची भूमिका साकारणारा कृष्णा भारद्वाज म्हणाला,“मुले देवाची भेट असतात. आमच्या टीममध्ये सामील झालेल्या या लहानग्यासोबत खेळण्यासाठी,मजा करण्यासाठी आम्हाला वेळ पुरत नाही. आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. येणारे भाग त्याच्यामुळे अधिक मजेशीर असणारआणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे असतील.”रामाची पत्नी शारदाची भूमिका साकारण्यासाठी नव्याने मालिकेत दाखल झालेली निया शर्मा म्हणाली, “मला लहान मुले फार आवडतात.या मालिकेत छोटा पाहुणा आल्याने आमच्यातील नाते अधिक घट्ट झाले आहेत. या छोट्यासोबत ही कथा कशी पुढे जाते, हे पाहणे रंजक असणार आहे.” 

टॅग्स :तेनाली रामा