सोनी सब वाहिनीवरील 'तेनाली रामा' या मालिकेत तेनालीने विविध गुंतागुंतीच्या प्रसंगातून सुटण्यासाठी लढवलेल्या युक्ता प्रेक्षकांना कायमच आकर्षित करत असतात. समस्या काहीही असो, त्यातून सुटण्यासाठी तेनाली काही शक्कल लढवेल, हे सगळ्यांना ठाऊक असते. पण, पालकत्त्वामध्ये अशा काही युक्त्या नसतात. या मालिकेच्या येत्या काही भागांमध्ये तेनालीसाठी फारच कठीण परिस्थिती उद्भवणार आहे. कारण, तेनाली आणि शारदाचा मुलगा भास्करचे अपहरण होणार आहे.
'तेनाली रामा' या मालिकेत अम्मा (निमिषा वखारिया)ला वाटत आहे की तेनाली आणि शारदा (निया शर्मा) मुलाच्या संदर्भात पुरेसे जबाबदार नाहीत. त्यामुळे भास्करची काळजी घेण्यासाठी आळीपाळीने जबाबदारी उचलण्याचे ते दोघे ठरवतात.तेनालीची पाळी येते तेव्हा बरीच कामे शिल्लक असल्याने तो भास्करला आपल्यासोबत दरबारात घेऊन जातो. घरी परतताना चुकून तेनाली भास्करला एका फळविक्रेत्याकडे विसरून येतो. हे लक्षात आल्याबरोबर तेनाली पुन्हा बाजारात जातो. मात्र, भास्कर कुठेच दिसत नाही. तेनाली भास्करला शोधू शकेल का? आपले मूल सुरक्षित असावे, म्हणून तो काय करेल? हे मालिकेच्या आगामी भागातच स्पष्ट होईल. तेनालीची भूमिका साकारणारा कृष्णा भारद्वाज म्हणाला, 'तेनाली रामा'पालकत्व हा रोज काही नवे शिकवणारा अनुभव असतो. त्यामुळे, प्रेक्षक आगामी भागांमधील कथानकाशी स्वत:ला जोडून घेऊ शकतील, हे नक्की. अर्थात, रामाचे पालकत्व काहीसे वेगळे असणार आहे. कारण, हे बाळ रामाचे बालपण त्याला पुन्हा मिळवून देणार आहे आणि दोघेही बरीच बदमाशी करणार आहेत.'तेनाली भास्करला शोधण्यासाठी काय शक्कल लढवतो, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. ही मालिका दर सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजता सोनी सब वाहिनीवर प्रसारीत होते.