काही महिन्यांपूर्वी कोरिओग्राफर टेरेन्स लुईस (Terence Lewis) आणि अभिनेत्री नोरा फतेही(Nora Fatehi) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. याबाबत टेरेन्सवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया नेटकऱ्यांनी म्हटले होते की, टेरेन्सने नोराला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. आता टेरेन्सने याबाबत मौन सोडले आहे.
टेरेन्स लुईस त्याच्या डान्ससाठी ओळखला जातो. अनेक डान्स रिअॅलिटी शोमध्ये त्यांना जज म्हणून काम पाहिलं आहे. दोन वर्षांपूर्वी नोरा फतेही इंडियाज बेस्ट डान्सर या डान्स रिअॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसली होती. व्हायरल झालेला व्हिडिओ त्यादरम्यानचा आहे. आता टेरेन्सने त्याच्यावर झालेल्या आरोपांवर मौन सोडले आहे.
टेरेन्स लुईसने सांगितलं सत्यमनीष पॉल(Manish Paul)च्या पॉडकास्टमध्ये या प्रकरणाविषयी बोलताना टेरेन्स म्हणाले, 'शोमध्ये शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांची पत्नी आले होते. गीता कपूरला वाटले की आपण त्यांचे चांगले स्वागत केले पाहिजे. गीता आणि मलायका अरोरा माझ्यासोबत शो जज करत होत्या पण नंतर मलायकाला कोविड झाला आणि ती काही काळ शोपासून दूर होती. त्यानंतर निर्मात्यांनी मलायकाऐवजी शो जज करण्यासाठी नोरा फतेहीला बोलावले.
टेरेन्स म्हणाला, 'मी एखाद्याला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करण्याचा प्रयत्न का करु ते पण तेव्हा जेव्हा मला माहिती आहे, माझ्या चारही बाजूला कॅमेरे आहेत. माझ्या हाताने नोराला स्पर्श झाला की नाही हे देखील मला आठवत नाही. आम्ही फक्त गीताचं ऐकलं. ते खरोखरच घाणरडे होते. मला मेसेजमध्ये शिवीगाळ करण्यात आली. मी याआधी नोरासोबत खूप जवळून डान्स केला आहे आणि जेव्हा तुम्ही परफॉर्मन्सच्या मध्यभागी असता तेव्हा तुम्ही त्या झोनमध्ये जाण्याचा विचारही करत नाही.'
याआधीही जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता तेव्हा टेरेन्स लुईसने स्वतःला निर्दोष म्हटले होते. या व्हिडिओशी छेडछाड करण्यात आल्याचे टेरेन्सने म्हटले होते. कोणाला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करण्याचा त्याचा कोणताही विचार नव्हता.
नोरा या विषयावर कधीही उघडपणे बोलली नाही. यानंतरही नोरा अनेक शोमध्ये टेरेन्ससोबत जज म्हणून दिसली आहे. दोघेही एकमेकांची कंपनी खूप एन्जॉय करतात. अभिनेत्रीने टेरेन्सबद्दल कधीही चुकीचे बोलली नाही किंवा तिने कधीही तिच्यावर कोणत्याही प्रकारचे आरोप केले नाहीत.