मुंबई: ठाकरे चित्रपटाचा म्युझिक लॉन्च सोहळा मुंबईत संपन्न झाला. यावेळी ठाकरे चित्रपटातील गाणी प्रदर्शित करण्यात आली. या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी, अभिनेत्री अमृता राव, खासदार आणि निर्माते संजय राऊत उपस्थित होते. या म्युझिक लॉन्चमध्ये 'आया रे सबका बापरे, कहते है उसको ठाकरे...' हे हिंदी गाणं या सोहळ्यात लॉन्च करण्यात आलं. यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये या गाण्याला यूट्यूबवर लोकांची पसंती मिळताना दिसते आहे. नकाश अजीननं हे गाणं गायलं आहे. ते गाणं ऐकताना मला थोडं भान ठेवावं लागलं. कारण त्यावेळी मला गाण्यावर ठेका धरावासा वाटला होता, अशी गाण्याच्या मेकिंगची आठवण उद्धव यांनी लॉन्चवेळी सांगितली.
VIDEO: 'आया रे सबका बापरे'; ठाकरे चित्रपटाचं म्युझिक लॉन्च
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 4:12 PM