Join us

त्यागराजला संतांचे वेड !

By admin | Published: May 18, 2015 12:11 AM

नाट्यसंगीत ते पॉंप अशी गाण्याची रेंज असलेला गायक त्यागराज खाडिलकरला सध्या संतमहात्म्यांचे वेड लागले आहे. त्यासाठी त्याने अवलियाचा गेट-अप धारण केला आहे.

नाट्यसंगीत ते पॉंप अशी गाण्याची रेंज असलेला गायक त्यागराज खाडिलकरला सध्या संतमहात्म्यांचे वेड लागले आहे. त्यासाठी त्याने अवलियाचा गेट-अप धारण केला आहे. म्हणजे तो ध्यानस्थ वगैरे बसलेला नाही; तर त्याचा हा उद्योग सुरू आहे तो एका एकपात्री संगीत नाटकासाठी! यासाठी तो चक्क दहा संतांच्या अभ्यासात रंगला आहे, आता बोला !